शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मदतगारांनाच ‘संधी’ गद्दारांचा ‘विचार’ करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 01:08 IST

नंदिनी बाभूळकर : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट

नेसरी/गडहिंग्लज : शेतकऱ्यांचे हित व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सन्मान हेच सूत्र आणि स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या विचारानेच गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत भूमिका घेतली जाईल. विधानसभेला ज्यांनी मदत केली त्यांनाच संधी आणि गद्दारी केलेल्यांचा ‘विचार’ केला जाईल, असा इशारा डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दिला.कानडेवाडी येथे गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी बी. एन. पाटील होते.बाभूळकर म्हणाल्या, ब्रीसक् कंपनी कारखान्याचा आर्थिक व्यवहार पाहील. मात्र, शेतकऱ्याचं हित व सभासदांची मालकी जपण्यासाठी नि:स्वार्थी आणि हक्काचं संचालक मंडळ हवं. गाव तिथे राष्ट्रवादी आहे. त्यामुळेच या निवडणुकीतही नक्कीच यश मिळेल.संध्यादेवी म्हणाल्या, गडहिंग्लज हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच भूमिका घेतली जाईल. जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, कारखान्यातील पहिल्या सत्तांतरापासून प्रत्येक निवडणुकीत स्व. कुपेकरांच्या शब्दावरच सभासदांनी विश्वास टाकला. मात्र, ज्यांना नेतृत्वाची संधी दिली, तेच उलटे गेले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच संधी मिळते, याचा विसर पडू नये.जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी म्हणाले, अवर्षणग्रस्त भाग असूनही पूर्वभागातील ऊस वेळेत जात नाही. एका ट्रॅक्टरच्या बाँडसाठी मुश्रीफ यांच्याकडे चारवेळा गेलो तरी काम झाले नाही. यावेळी जयसिंग चव्हाण , सतीश पाटील, माजी सभापती अमर चव्हाण यांनी मनोग व्यक्त केले. यावेळी ‘एव्हीएच’ प्रकल्प हद्दपार केल्याबद्दल नंदाताई बाभूळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, नारायण चव्हाण, अनिल पाटील, बी. वाय. पाटील, गणपतराव थोरात, रवींद्र आसवले, तुकाराम वार्इंगडे, जितेंद्र शिंदे, मंजूषा कदम यांचीही भाषणे झाली. बैठकीस उपसभापती तानाजी कांबळे, महाबळेश्वर चौगुले, मुन्ना नाईकवाडे, जनार्दन बामणे उपस्थित होते. संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढणारआगामी निवडणूक कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा मुश्रीफ यांनी यंदाच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी केली आहे. मात्र, ७० टक्के सभासद चंदगड मतदारसंघात असल्याचा वारंवार उल्लेख करून ही निवडणूक संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढविली जाईल, असे बहुतेक वक्त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.