शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मदतनीस चालवतेय पेरणोली उपआरोग्य केंद्र

By admin | Updated: March 26, 2015 00:28 IST

चार वर्षे डॉक्टर नाही : डॉक्टर नसल्याने रुग्णालयासह रुग्णांची हेळसांड

कृष्णा सावंत - पेरणोली (ता. आजरा) येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रात तब्बल चार वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर नसल्याने नाईलाजास्तव केंद्राच्या मदतनिसालाच कारभार चालवावा लागत आहे. पेरणोली हे आजरा तालुक्यातील मोठे गाव असल्याने येथे शासकीय डॉक्टरांची नितांत गरज आहे. तब्बल चार वर्षे उपआरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रुग्णालयासह रुग्णांचीही हेळसांड होत आहे. एकट्या शांता पताडे या मदतनीस म्हणून काम करण्याऱ्या महिलेलाच उपआरोग्य केंद्राचा कारभार हाकावा लागत आहे. या सगळ्या प्रकाराकडे गावकऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.पताडे या २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उपआरोग्य केंद्रात काम करीत आहेत. अनेक डॉक्टरांच्या हाताखाली काम केल्याने साधारण सर्दी, खोकला या आजारांवरील औषधांचा त्यांना अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरच त्या एकहाती केंद्र चालवित आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आठवड्यातून एक दिवस डॉक्टरांची नेमणूक केली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते; परंतु ते कधी येतात, याची कुणालाही कल्पना नाही.पेरणोलीकरांनी लोकवर्गणीतून केंद्राचे सुशोभीकरण केले आहे. आरोग्यसेविका सुवर्णा सावरतकर, आशा स्वयंसेविका मंदाकिनी कोडक, रेखा दोरुगडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकवर्गणीतून रंगरंगोटी, समोरील गेट दुरुस्ती, आदी कामे करण्यात आली आहेत. वैद्यकीय तपासणी वगळता गरोदर मातांचे आरोग्य, प्रसूती स्त्रियांना मार्गदर्शन, आदी कामकाज उत्कृष्टपणे चालू आहे. याबाबत गावकरी समाधानी आहेत.मात्र, येथील वैद्यकीय विभाग बंद असल्याने पेरणोलीसह हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडी, धनगरवाडा, चव्हाणवाडी या वाड्यावस्त्यांवरील रुग्णांची कुचंबणा होत आहे. डॉक्टर नसल्याने अनेक गरीब, गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयांचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतब्बल चार वर्षे डॉक्टर नसताना परिसरातील एकाही लोकप्रतिनिधीने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. तात्पुरत्या स्वरूपातील डॉक्टरांसाठीही आग्रह धरलेला नाही. लोकप्रतिनिधींना केवळ रस्ता आणि गटारीमध्येच इंटरेस्ट आहे का? असा सवाल करून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.