शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पडझड झालेल्या घरात राहत नसाल तरच मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 06:16 IST

पूरग्रस्तांच्या मदतीचा अजब ‘जीआर’

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुरामुळे बाधित झालेले कुटुंब पडझड झालेल्या घरामध्ये राहत नसल्याची खात्री ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनाम्याद्वारे केल्यानंतरच पूरग्रस्तास घरबांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाईल, असा अजब आदेश महसूल विभागाने गुरुवारी काढला. त्यामुळे डागडुजी करून घरात कसेबसे राहत असलेल्यांना मदत दिली जाणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील घरांसाठी हा जीआर काढला आहे. किमान १५ टक्के पडझड झालेली कच्ची, पक्की घरे (झोपडी वगळून) बांधण्यास आर्थिक मदत ही विविध घरकुल योजना आणि आपत्ती प्रतिसाद निधीतून दिली जाणार आहे.बाधित कुटुंबाची तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेने केलेली नसेल अशा कुटुंबाला तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था करून घेण्यास शहरी भागात ३६ हजार रुपये आणि ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी मदत म्हणून देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित कुटुंब पडझड झालेल्या घरात राहत नाही याची खात्री करून घेतल्यानंतरच ही रक्कम दिली जाणार आहे.

शेतीच्या नुकसानीसाठी एक हेक्टरपर्यंतचेच पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. पीककर्ज नसलेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे किमान ५० टक्के नुकसान झालेले असेल तर त्या पिकासाठी/क्षेत्रासाठी देय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. ३३ ते ५० टक्के दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जाणार आहे.

हा जीआर त्यांच्या हिताचाच - चंद्रकांत पाटीलयाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनाला पूरग्रस्तांच्या जीवाची काळजी आहे. त्यांनी पडक्या घरात राहू नये, ही भूमिका त्यामागे आहे. आम्ही त्यांना पर्यायी घराच्या भाड्यासाठी एकरकमी रक्कम देणार आहोत व त्यांची घरे उभारण्यासाठी भरीव आर्थिक मदत देणार आहोत. त्यामुळे हा जीआर त्यांच्या हिताचाच आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर