शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दिगवडेतील शरदच्या मदतीला सरसावले दातृत्वाचे हात, ‘लोकमत’च्या बातमीमुळे साडेतीन लाखांची मदत जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:27 IST

विक्रम पाटील करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील शरद शहाजी शिंदे (वय ३८) याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान ...

विक्रम पाटीलकरंजफेण : पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील शरद शहाजी शिंदे (वय ३८) याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान होताच त्याच्या घरची मंडळी हदरून गेली होती. मुलाचा जीव वाचविण्यासाठी आई मंगल यांनी किडणी देण्याची तयारी दर्शविली, मात्र किडणी प्रत्यारोपणासाठी सात लाख रुपये खर्च येणार असल्याने भूमिहीन कुटुंब असलेल्या शिंदे कुटुंबाकडे एवढे पैसे कोठून जमा करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. ‘लोकमत’मधून (गुरुवारी, दि.१) ‘आई मुलास देणार किडणी; खर्चासाठी जीव कासावीस’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच समाजातील दातृत्वाचे हात सरसावले अन् अवघ्या तीन दिवसांत साडेतीन लाखांची मदत जमा झाली. अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे.शरद याची गावातच केस कर्तनालयाची टपरी आहे. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून पत्नी, दोन चिमुकली मुले व आई-वडिलांचा सांभाळ करीत होता. मात्र, अचानक आलेल्या संकटाने त्याचे कुटुंब हादरले. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सरपंच मारुती पाटील, पोलिस पाटील नंदकुमार पाटील, माजी सरपंच सुनंदा शिंदे, स्वप्निल वजार्डे, संग्राम पाटील, शेखर शिंदे यांनी कुटुंबाला आधार देऊन मदत जमा करण्यास सहकार्य करत आहेत.शरद याचा जीव वाचविण्यासाठी दिगवडे गाव एकवटले असून समाजातील मारुती केरबा पाटील, विजया जाधव, सागर वरपे, अतुल पाटील यांच्यासह समाजातील अनेकांनी आपल्या परीने मदत जमा करून समाजभान जपले आहे. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात शरद याच्यावर किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल