शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांच्या मदतीने पूरपरिस्थितीच्या संकटावर मात करु - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 15:41 IST

दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी शरद पवार बोलत होते.

कोल्हापूर : महापूराची जबरदस्त किंमत सर्वांना द्यावी लागली आहे. अशा कठीण काळातही राजर्षी शाहूंच्या या नगरीने सर्वांना एकसंध ठेवण्याचे काम केले आहे. इथूनपुढेही एकमेकांना साथ देऊन या पुरपरिस्थितीवर मात करुया, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री व  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले.

दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर माधवी गवंडी, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के.पोवार, महिला शहराध्यक्षा जहीदा मुजावर, उद्योजक व्ही. बी. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, संचालक आदिल फरास आदी प्रमुख उपस्थित होेते.

शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पवार यांच्या हस्ते सुतारवाडा येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. शरद पवार म्हणाले, 'महापुरामुळे आपणा सर्वांनाच जबरदस्त किंमत मोजावी लागली आहे. एकाबाजूला महापूर तर दुस-या बाजूला पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन टॅँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत सर्वांना एकसंध ठेवण्याची प्रेरणा या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या नगरीने केला आहे. इथूनपुढे पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवरही मात करुया.'

यावेळी वसंतराव मुळीक, बबन रानगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अल्ताफ झांजी, आप्पासाहेब धनवडे, महादेव पाटील, प्रकाश पाटील, निरंजन कदम आदी उपस्थित होते.

पुरग्रस्त महिलांनी बांधल्या शरद पवारांना राख्या सुतारवाडा येथील पूरग्रस्त महिलांनी शरद पवार यांच्यासह आ. मुश्रीफ, माजी खा. महाडिक आदी मान्यवरांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKolhapur Floodकोल्हापूर पूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन