शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बोचऱ्या वाऱ्यांनी कोल्हापुरात गारठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:00 IST

कधी कडक ऊन, तरी कधी ढगाळ हवामान असा सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांची शुक्रवारची पहाट मात्र कुडकुडत उगवली. बोचरे वारे वाहत असल्याने अंगातील गारठा कायम राहिला.

ठळक मुद्देबोचऱ्या वाऱ्यांनी कोल्हापुरात गारठाकिमान तापमान १५.५ सेल्सिअस अंशांवर

कोल्हापूर : कधी कडक ऊन, तरी कधी ढगाळ हवामान असा सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांची शुक्रवारची पहाट मात्र कुडकुडत उगवली. बोचरे वारे वाहत असल्याने अंगातील गारठा कायम राहिला.कोल्हापूरकरांनी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता या वर्षी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतलाच नाही. आता उन्हाळा तोंडावर असताना जाता-जाता तरी कडाक्याची थंडी जाणवेल, या आशेवर कोल्हापूरकर होते.

गेल्या चार दिवसांपासून दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सलग तीन दिवस दाट धुके पडले. गेले आठवडाभर पहाटे दव पडण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे सकाळी काही काळ गारठा जाणवत होता; पण दिवसभर पुन्हा उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली होती.शुक्रवारी मात्र अचानक थंडी जाणवू लागली. बोचरे वारे वाहत असल्याने अधिकच हुडहुडी भरली. दिवसभर हवेत गारवाच राहिला. किमान तापमान १५.५ सेल्सिअस अंशांवर आले. मागील दोन दिवसांपूर्वी ते १७ सेल्सिअस अंशांवर होते. कमाल तापमानही २८ च्या पुढे गेले होते.या संदर्भात हवामान खात्याकडे विचारणा केली असता, सध्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात काही ठिकाणी शीत लहर तर काही ठिकाणी पाऊस असे वातावरण आहे. दक्षिण भारतातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात मोडणाऱ्या कोल्हापुरात सध्या हवामान कोरडे आणि अंशत: ढगाळ असेच आहे. किमान तापमानात वाढच होणार असल्याचे आकडे सांगत आहेत. ते कमाल ३० ते ३२ पर्यंत, तर किमान १४ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे.दिनांक २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. भारतीय कालगणनेनुसार शिवरात्रीला थंडीचा महिना संपून उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे आता थंडीचा महिना संपण्यासाठी शेवटचे १२ दिवस राहिले आहेत. शेवटी-शेवटी थंडी आपला रंग दाखवणार की उन्हाच्या झळा तीव्र होणार, ते कळणार आहेस्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संस्थेने तर सध्या भारतात विचित्र हवामानाचा अनुभव येत असल्याचे नमूद करताना महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळेच सध्या राज्यात वातावरणात झपाट्याने बदल झाला आहे. कोल्हापुरात काहीसा गारठा, तर विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाजही ‘स्कायमेट’ने दिला आहे. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर