शहरं
Join us  
Trending Stories
1
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
2
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
3
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
4
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
5
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
6
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
7
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
8
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
9
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
10
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
11
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video
12
शाहरुखच्या 'सर्कस' मालिकेतील मारियासाठी रेणुका शहाणेंना नव्हती पहिली पसंती, पण अशी मिळाली ही भूमिका
13
उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात
14
धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
15
भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार
16
Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी
17
बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले
18
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
19
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
20
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा

अवजड वाहनांना जोतिबावर प्रवेशबंदी, चोपडाई देवीच्या यात्रेनिमित्त बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:17 IST

वाडी रत्नागिरी जोतिबा येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ५ व ६ आॅगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या वाहनधारकांची संख्या, उपलब्ध पार्किंगची ठिकाणे, सातत्याने पडणारा पाऊस, निसरडा रस्ता यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी काही मार्ग एकेरी केले असून, मालवाहू ट्रक, प्रवाशी रिक्षा, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांना डोंगरावर जाण्यास प्रवेशबंदी केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ठळक मुद्देअवजड वाहनांना जोतिबावर प्रवेशबंदीचोपडाई देवीच्या यात्रेनिमित्त बंदोबस्त

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी जोतिबा येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ५ व ६ आॅगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या वाहनधारकांची संख्या, उपलब्ध पार्किंगची ठिकाणे, सातत्याने पडणारा पाऊस, निसरडा रस्ता यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी काही मार्ग एकेरी केले असून, मालवाहू ट्रक, प्रवाशी रिक्षा, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांना डोंगरावर जाण्यास प्रवेशबंदी केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.जोतिबा यात्रेसाठी कोल्हापूरहून केर्ली व कुशिरे फाटा मार्गे जाणारी वाहने केर्ली फाटा येथून सामाजिक वनीकरण ते गायमुख जुने आंब्याचे झाड ते जोतिबा डोंगर या मार्गावरून कार, जीप मोटारसायकल अशी हलकी वाहने सोडली जातील. कोल्हापूरहून यात्रेसाठी येणाºया एस. टी, खासगी बस, ट्रक, सिंगल ट्रॉली ट्रॅक्टर, आयशर ही वाहने वाघबीळ मसोबा देवालय टी पॉर्इंट माले फाटा, दानेवाडी फाटा, दानेवाडी क्रॉसिंग जुने आंब्याचे झाडमार्गे जोतिबा डोंगरावर रवाना होणार आहेत.

रत्नागिरी, शाहूवाडीकडून येणारी सर्व वाहने म्हसोबा देवालय येथून पुढे डोंगरावर जातील. टोप संभापूर टी पॉर्इंट ते कासारवाडा, सादळे-मादळे, गिरोली मार्गे येणारी वाहने गिरोली फाटा किंवा दानेवाडी क्रॉसिंगमार्गे जोतिबा डोंगरावर रवाना होतील. वारणानगरकडून येणारी सर्व वाहने गिरोली फाटा किंवा दानेवाडी क्रॉसिंगमार्गे पुढे जोतिबा डोंगरावर रवाना होतील. यात्रा संपल्यानंतर यात्रेकरूंची वाहने घाट उतरताना वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जोतिबा डोंगरावर येणारी वाहने मंगळवारी (दि. ६) सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जुने आंब्याचे झाड, माले फाटा, दानेवाडी फाटा, गिरोली गायरान येथील पाण्याची टाकी या ठिकाणी थांबविण्यात येतील.असे आहे वाहनतळयमाई मंदिरालगत तळ्याजवळ-दुचाकी, यमाई मंदिराजवळ दोन्ही बाजूस चारचाकी, मेन पार्किंग-लक्झरी, मिनी बस, चार चाकी, ग्रामपंचायत पार्किंग-चार चाकी, ट्रक पार्किंग-ट्रक व टेम्पो, जुने स्टँडसमोर-चार चाकी, पी डब्ल्यू डी. जुने रेस्ट हाऊस-दुचाकी,यात्री निवाससमोर-चार चाकी असे आहे. 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर