सोळांकुर : गेले चार दिवस बंद असलेल्या फोंडा घाटातील मोरीतील पाइप खचून खड्डा पडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने (१३ जुलै ) सकाळपासून घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिला आहे. घाटातील मार्ग वाहतुकीस मोकळा झाल्याने वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला आहे.देवगड- निपाणी राज्य महामार्गावर फोंडा घाटात किमी ६१ / ७०० या मोरीतील पाइप खचून रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा निर्माण झाल्याने या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. एकेरी वाहतूक करून काम करणे शक्य नसल्याने काही दिवस अवजड वाहनांना या घाटातून वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. मोरेतील पाइप बदलून खड्डा पूर्णपणे मुजवला आहे. संबंधित विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून सकाळपासून हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतुकीस मोकळा केला आला आहे.गेले चार दिवस हजारो वाहने या महामार्गावर विविध ठिकाणी थांबली होती. या सर्वांना टप्प्याटप्प्याने फोंडा घाटात वाहतुकीस परवानगी द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
Kolhapur: फोंडा घाटातून अवजड वाहतूक आजपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 15:45 IST