शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

कोल्हापूरला वळवाचा दणका, वाऱ्यामुळे झाडांची पडझड; रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक ठिकाणी नुसत्या हलक्या सरी कोसळल्या. वाऱ्यामुळे ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक ठिकाणी नुसत्या हलक्या सरी कोसळल्या. वाऱ्यामुळे शिवाजी विद्यापीठ परिसरात झाडांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात आगामी चार-पाच दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.गेली दोन दिवस जिल्ह्यात वळीव पाऊस पडेल तिथे पडेल, असा होत आहे. रविवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पाणी पाणी झाले. तर काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. सोमवारी सकाळपासूनच उष्म्यात वाढ झाली होती. दुपारनंतर पाऊस तडाखा देणार असेच वाटत होते. दुपारनंतर कोल्हापूर शहरात मेघगर्जना सुरू झाली आणि सरी कोसळू लागल्या; पण काही ठिकाणी जोरदार तर इतर भागांत हलका पाऊस झाला.बसस्थानक परिसरात पाऊस..सोमवारी दुपारी दाभोलकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, ताराराणी पुतळा या भागात जोरदार पाऊस झाला. रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. मात्र, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, दसरा चौक या परिसरात तुरळक सरी कोसळल्या.पाऊस उघडला, कोंडी वाढलीअचानक पाऊस तेही जोरदार सुरू झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला गाड्या लावून थांबले होते. पाऊस उघडला आणि एकदम सगळे रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस