शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; एकाचा मृत्यू-पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:18 IST

जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसºयांदा पात्राबाहेर आली.

ठळक मुद्दे: ५१ बंधारे पाण्याखाली; अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; वाहतूक गगनबावडामार्गे वळविली

कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसºयांदा पात्राबाहेर आली.अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने गगनबावडामार्गे; तर पाणीपातळीत वाढ झाल्याने राज्य व प्रमुख जिल्हा अशा आठ मार्गांवरील वाहतूक अंशत: बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. शहरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने सखल भागांत पाणी साचून ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते. सर्व भाजी मंडया ठप्प राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

शहरातील भाजी मंडयाही ठप्प होऊन नागरिकांची गैरसोय झाली. या पावसाने हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला होता. पंचगंगा नदीचे पाणी दुसºयांदा पात्राबाहेर आले असून ते पाहण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी गर्दी केली. या पावसाने जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होऊन ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. तसेच राज्य व प्रमुख अशा आठ मार्गांवरील वाहतूक अंशत: किंवा बंद करून ती पर्यायी मार्गांनी वळविली. कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे ती गगनबावडामार्गे वळविण्यात आली. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १२५, दूधगंगा ८४, पाटगाव १४२, घटप्रभा १०९, तर कोदे धरणक्षेत्रात २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ‘राधानगरी’तून प्रतिसेकंद १६००, ‘कडवी’मधून १८०, ‘कुंभी’मधून ३५०, ‘घटप्रभा’मधून ३५२२, ‘जांबरे’तून १२४९, तर कोदे धरणातून ८१८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची राजाराम बंधाºयाजवळील पाणीपातळी गुरुवारी सायंकाळपर्यंत ३३.८ फुटांवर राहिली.जिल्ह्यात ३७.१५ मि.मी. पाऊस

गुरुवारी सकाळी आठपर्यंत नोंद झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा - हातकणंगले (५.८८), शिरोळ (४.५७), पन्हाळा (३२.७१), शाहूवाडी (५७.६६), राधानगरी (४७.००), गगनबावडा (९१.००), करवीर (१९.१८), कागल (२१.५७), गडहिंग्लज (२३.२८), भुदरगड (५५.८०), आजरा (५०.००), चंदगड (३७.१६).जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखालीधुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील ७, भोगावती नदीवरील ४, तुळशीवरील १, कासारीवरील ९, कुंभीवरील २, दूधगंगेवरील २, वेदगंगेवरील ८, ताम्रपर्णीवरील ४, घटप्रभावरील २, धामणीवरील २, कडवीवरील ८, वारणावरील २ बंधारे पाण्याखाली गेले.

पडझडीत अडीच लाखांचे नुकसानमुसळधार पावसाने साळगाव (ता. आजरा) येथील गणपती भीमा मांग यांच्या घराच्या भिंतीची अंशत: पडझड होऊन १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मालेवाडी (ता. शाहूवाडी) येथील विष्णू रामचंद्र चिंचावडेकर यांच्या घराची भिंत कोसळून आठ हजार रुपये, आमरोळी (ता. चंदगड) येथील लक्ष्मण धोंडिबा मोरे यांच्या घराची पडझड होऊन अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर भुदरगड तालुक्यात पक्क्या घराच्या चार भिंती, कच्च्या घराच्या सहा भिंती व गोठ्याच्या एका भिंतीचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा आजचा व एकूण टी.एम.सी.मध्ये पुढीलप्रमाणे : राधानगरी - ५.२६ (८.३६१ एकूण पाणीसाठा), तुळशी २.२४ (३.४७१), वारणा २३.८३ (३४.३९९), दूधगंगा १४.३५ (२५.३९३), कासारी २.०० (२.७७४), कडवी १.९८ (२.५१५), कुंभी १.८३ (२.७१३), पाटगाव २.४१ (३.७१६), चिकोत्रा ०.२९ (१.५२२), चित्री ०.९५ (१.८८६), जंगमहट्टी ०.६३ (१.२०८), घटप्रभा १.५६ (१.५४५), जांबरे ०.८२ (०.८२०), कोदे ०.२१ (०.२१४).

अणदूर बंधारा पाण्याखालीसाळवण : सलग पाचव्या दिवशीही गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील वेतवडे, मांडुकली व अणदूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वेतवडे, अणदूर, मणदूर, मांडुकलीसह अन्य वाड्यावस्त्यांची वाहतूक कोलमडली असून, त्यांना मार्गेवाडी मणदूर पुलावरून ये-जा करावी लागते आहे.

चंदगडला चार बंधारे पाण्याखालीचंदगड : ताम्रपर्णी, घटप्रभा नद्या दुथडी भरून वाहत असून, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोनेवाडी, तर घटप्रभा नदीवरील गवसे, हिंडगाव हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आजरा व दोडामार्ग वाहतूक बंद आहे. दोडामार्ग-गोव्याला जाणाºया बसेस पाटणे फाटा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाने कमळाबाई गावडे (तुर्केवाडी) यांच्या घराच्या दोन भिंती, रत्नाबाई कांबळे (शिरगाव) यांच्या व दत्तू कांबळे (चंदगड) यांच्या घराची भिंत कोसळून तर लक्ष्मण धोंडिबा मोरे (अमरोळी) यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.

भिंत कोसळून नुकसानगडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्याने शहरातील बिलावर वाड्यातील काशव्वा शंकर बिलावर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी व घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्व भागातील दुबार पेरणीचे संकट टळले असून, धोक्यात आलेल्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. तालुक्यात गुरुवारी दिवसभरात २३.५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कृष्णेच्या पाणी पातळीत वाढनृसिंहवाडी/कुरुंदवाड/जयसिंगपूर : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत दोन फुटांनी वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे, तर नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिराजवळ कृष्णा नदीचे पाणी आले आहे.नृसिंहवाडी परिसरात दमदार पाऊस झाल्याने पेरणी करून पावसाची वाट पाहत असलेला बळिराजा आनंदात आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. जयसिंगपूर येथील शाहूनगरमध्ये आठवडा बाजारात भरपावसातदेखील गर्दी दिसत होती.गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा व कृष्णेची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस असला तरी शिरोळ तालुक्यात मोठा पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. धरण क्षेत्रात कोसळणाºया पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यातच शिरोळ तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.इचलकरंजीत जुन्या पुलावरून वाहतूक बंदइचलकरंजी : शहर व परिसरामध्ये गुरुवारी मान्सून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, येथील पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, यंदा प्रथमच पुराचे पाणी पात्राबाहेर पडले.येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी बुधवारी (दि. ११) सायंकाळी ५५ फूट होती, ती गुरुवारी साडेसत्ताव्वन फूट इतकी झाली. पुराच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पंचगंगा नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. नगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्था पथक पंचगंगा नदीतीरावर तैनात केले आहे. गुरुवारी रात्री उशिरा लहान पुलावर पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.शाहूवाडीत नऊबंधारे पाण्याखालीमलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पावसाची संततधार जोरात वाढली असून, धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नऊ बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. कासारी नदीवरील पेंडाखळे, बाजार भोगाव, वाळोली, पुनाळ, ठाणे-आळवे या बंधाºयांसह जांभळी नदीवरील किसरुळ- मुगडेवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. शेतशिवारही जलमय झाले आहेत. पुराचे पाणी घुसण्याची शक्यता गृहीत धरून एस. के. पाटील सहकार संकुलातील गाळेधारक व्यापाºयांसह ठाणेकर वेल्डिंग सेंटर परिसरातील दुकानदारांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस