शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापुरात वळवाचा जोरदार पाऊस, सहा ठिकाणी झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 18:42 IST

Rain Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. ​​​​​​​

ठळक मुद्दे कोल्हापुरात वळवाचा जोरदार पाऊसकोल्हापुरात सहा ठिकाणी झाडे पडली

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळे थोडा दिलासा मिळाला.शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. आधी जोरदार वारे सुटले. विजांचा लखलखाट आणि कडकडाट सुरू झाला. सुमारे पाऊण तास जोरदार पावसाने शहराला झोडपले. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडताच त्याचा दर्प सुखावणारा होता. या जोरदार पावसाने शहराच्या रस्त्यावरून, रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीतून पाणी वहायला लागले, सखल भागात तर पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी गटारी, चॅनेल तुंबल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर आले. 

मंगळवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या वळवाच्या पावसामुळे कोल्हापूर शहरात सहा ठिकाणी झाडे पडली. रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस या रस्त्यावर एक झाड उन्मळून पडल्यामुळे काही काळ बालिंगा, कुडित्रे तसेच कोकणाकडे जाणारी वाहतूक थांबली. पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली.शहराबरोबरच शहरालगतच्या करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातही जोरदार पाऊस पाऊस झाला. ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर