शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

कोल्हापूर : गगनबावड्यात अतिवृष्टी, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस : नद्यांचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 6:19 PM

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

ठळक मुद्देगगनबावड्यात अतिवृष्टी, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस नद्यांचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांची दैना उडवून दिली आहे. तरणा-म्हाताऱ्या पावसासारखा झडीचा पाऊस सुरू आहे. या पावसाला गारठा असल्याने दिवसभर अंगातील हुडहुडी जात नाही.

या पावसाचा शेती कामावर परिणाम झाला असून सध्या खरीप पिकांच्या खुरपणीचे काम सुरू आहे; पण शिवारात पाणी राहिल्याने खुरपणीचे काम करता येत नाही. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २८.९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. शाहूवाडी, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. धरणक्षेत्रात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.राधानगरी धरणाचा ३ व ६ व्या क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून प्रतिसेकंद ४ हजार ४५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे; त्यामुळे भोगावती नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. ‘वारणा’ धरणातून ६०८८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ‘कुंभी’, ‘कडवी’, ‘कासारी’सह इतर नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता २६.७ फूट होती, सायंकाळपर्यंत त्यात फुटाची वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील १४ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहिशी विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यात १८ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून यामध्ये ३ लाख ४८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (९.३७), शिरोळ (८.७१), पन्हाळा (२३.५७), शाहूवाडी (३६.८३), राधानगरी (३९.३३), गगनबावडा (७०), करवीर (१८.२७), कागल (२७), गडहिंग्लज (१५.८५), भुदरगड (३४.८०), आजरा (२७.५०), चंदगड (३५.६६). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर