शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:10 IST

कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊसपिकांची तहान भागणार: लोकांची उडाली तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.गेले दोन दिवस रात्री व पहाटेही गार वारे वाहत होते. थंडीही सुुरू झाली होती. त्यामुळे पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की काय, अशी भीती व्यक्त होत होती. दुपारी तीनच्या सुमारास आभाळ दाटून आले. ढगांचा गडगडाटही वळिवासारखा होता. बघता-बघता जोरदार पाऊस सुरू झाला. तापलेला मातीचा गंध आसमंतात भरून गेला. तासभर हा पाऊस सुरू राहिला तरी रिपरिप मात्र बंद झाली नव्हती.एवढ्या लवकर पाऊस जाणे परवडणारे नव्हते; कारण पिकांना अजूनही पावसाची गरज आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये सुरू झालेला पाऊस मध्ये थांबलाच नाही. तब्बल ५० दिवस तो एकसारखा पडत होता. त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त होऊन गेले होते. पिकांची वाढही थांबली होती. ‘नको आता पाऊस’ असे म्हणण्याची वेळ आली होती. हा पाऊस आॅगस्टच्या अखेरीस थांबला. तो असा थांबला की आॅक्टोबरसारखा उन्हाचा तडाखा सुरू झाला.

सुरुवातीला पंधरा दिवस पिकांनाही ते पोषक होते; परंतु जसजशी उघडीप वाढली तशी पिके अडचणीत येऊ लागली होती. आता जिल्ह्यात भात पोटरी भरण्याची स्थिती आहे. सुरुवातीला धूळवाफ पेरणी झालेले भात बाहेर पडले आहे. भुईमूगही शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची काढणी मात्र अनेक ठिकाणी सुरू झाली आहे. ऊस वाळू लागला नसला तरी त्यालाही पाण्याची गरज होती. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडविली तरी सर्व प्रश्न निसर्गाने एका तासात सोडविले. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊसkolhapurकोल्हापूर