शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली

By राजाराम लोंढे | Updated: September 27, 2023 19:09 IST

मंगळवार (दि.३ ऑक्टोबर) पर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज

कोल्हापूर : परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अक्षरश: झोडपून काढले. अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसाने शहरात सगळीकडे पाणीच पाणी करून सोडले. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कडगाव, शिरोळसह पाच सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.ऐन मान्सूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने तासभर झोडपून काढले. ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शिवारात पाणी साचले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शिरोळ, कडगाव, आंबा, हलकर्णी, कसबा नूल या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी पावणेचार वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने सुरुवात केली. अर्धा-पाऊण तासात सगळीकडे पाणीच पाणी केले.मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात रोज परतीचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. ओढे-नाले ओसंडून वाहत असून, असाच पाऊस आणखी दोन दिवस राहिला तर धरणातून विसर्गही वाढणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यताही आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस