शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फू र्त प्रतिसाद

By admin | Updated: August 12, 2016 00:05 IST

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’चा उपक्रम : बालकांची मोफत आरोग्य तपासणी; हेल्थ कीटचे वाटप

कोल्हापूर : हसत्या खेळत्या बाळांच्या उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि ‘लोकमत’ यांच्यातर्फे बुधवारी डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे आयोजित केलेल्या हेल्दी बेबी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळीबालरोगतज्ज्ञांकडून बालकांची मोफत तपासणी करून आरोग्य सल्ला देण्यात आला.शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाड्रिक या संस्थेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. राहुल शिंदे, डॉ. छाया पुरोहित, डॉ. दीपा फिरके, तसेच ‘जॉन्सन’चे एरिया सेल्स मॅनेजर नरेश कापदुले, सागर थोरात, देवेंद्र माळी, अजित वालावलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहन पाटील यांनी बाळांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक वाढीसाठी योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. छाया पुरोहित यांनी लसीकरणाच्या आवश्यकतेविषयी उपस्थितांना माहिती दिली. एकूण तीन गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. यासाठी ० ते १ वर्षे, १ ते ३ वर्षे, आणि ३ ते ५ वर्षे असे तीन गट केले होते. दुपारी १ वाजल्यापासूनच शिबिराच्या ठिकाणी नोंदणीसाठी पालकांनी चिमुकल्यांसह गर्दी केली होती. कार्टुन जेरीने सर्वांचे स्वागत केले. त्यामुळे वातावरण हर्षोल्हासित झाले होते. हा उत्साह शिबिर संपेपर्यंत टिकून होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी चिमुकल्यांसाठी विविध खेळण्यांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या कुटुंबाचे छायाचित्र काढून ते आठवणीतले खास छायाचित्र आकर्षित फ्रेममध्ये त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या शिबिरात शेकडो बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक सहभागी बालकास सहभाग प्रमाणपत्र, ‘जॉन्सन’तर्फे हेल्थ किटची भेट देण्यात आली. शिबिरात बाळांची तपासणी डॉ. रवी पोवार, डॉ. अमर नाईक, डॉ. अमोल गिरवलकर, डॉ. विजय गावडे यांनी केली. सुखदा आठले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)वेगळी संकल्पना : आय. ए. पी. कोल्हापूर यांचे सहकार्यसर्वाधिक मातांचा लाडका ब्रँड असलेल्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि सामाजिक बांधीलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी हे पाऊल उचलून वेगळी संकल्पना मांडली आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने दिली. आय.ए.पी. (इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाटिक्स्’) ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी आय. ए. पी. कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले.