शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्री राजेश टोपेंना गैरव्यवहार चौकशीचा विसर, कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:30 IST

कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असल्याची चर्चा चार जिल्ह्यातील आरोग्य विभागात रंगली होती. त्याचे वृत्त लोकमतमध्ये २२ सप्टेंबर २०२१ प्रसिद्ध होऊनही अद्याप या साखळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असल्याची चर्चा चार जिल्ह्यातील आरोग्य विभागात रंगली होती. त्याचे वृत्त लोकमतमध्ये २२ सप्टेंबर २०२१ प्रसिद्ध होऊनही अद्याप या साखळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.या प्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही चौकशीचे आदेश देण्याचे विसरले.

या कार्यालय अंतर्गत चार जिल्हे येत असून यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यात पदानुसार देवघेव झाली होती. या देवघेवीची दखल आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी देखील घेतली होती. मात्र अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याने कार्यालयातील टोळीने आमचे कोणी काही करु शकत नाही अशी भीती चार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या मनात या साखळीने घातली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री महोदय यांच्यापर्यंत वृत्त पोहोचताच त्याची गंभीर दखल घेऊन आरोग्य मंत्री टोपे यांनी आरोग्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या साखळीची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या चौकशीचे काय झाले हे अद्याप समजले नाही. शिवाय ही साखळी पुन्हा नव्याने देवघेवीच्या कामाला लागली आहे.

बदली फक्त कागदावरच....

- या साखळीतील एका कर्मचाऱ्याची पदोन्नतीवर सीपीआर रुग्णालय येथे बदली करण्यात आली. मात्र अन्य कर्मचाऱ्यांनी अशी बदली मागितल्यास त्याला मुख्यालय ठिकाणी बदली देता येत नसल्याचे सांगितले जाते. हा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जवळचा असल्याने तो सीपीआर मध्ये फक्त एक दिवस हजर झाला.- पाच महिन्यांपासून या साखळीतील कर्मचारी हा बदली सीपीआरला काम मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालयात करत आहे. तशीच स्थिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची आहे. त्याची बदली उपसंचालक कार्यालयात झाली आहे तरी तो सीपीआर मध्येच काम करत आहे. हे दोन्ही कर्मचारी साहेबांच्यासाठीच वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Topeराजेश टोपे