शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-आरोग्य विभागाने मास्कची तातडीने खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:41 IST

सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष करण्यासाठी पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने मास्कची तातडीने खरेदी करावीजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कोरोनोच्या पातळीवर दक्षता

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष करण्यासाठी पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व समितीची बैठक झाली. त्यास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई यांनी सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या तयारीबाबत आढावा घेतला. एकूण ३४ विलगीकरण कक्ष तयार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात किमान १०० बेड विलगीकरण कक्षाची तयारी ठेवावी. त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांची पाहणी करून यादी तयार करावी. पर्यटक अथवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत विशेष काळजी घ्यावी. ‘एन-९५’मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी त्याची खरेदी करावी. वृत्तपत्रे, आकाशवाणीवरून उपाययोजना याबाबतची जनजागृती करावी. नागरिकांमध्ये भीती पसरणार नाही याची काळजी घ्यावी.

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी