शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘डोक्याला शॉट’ मराठी सिनेमाच्या कलाकारांनी दिली ‘लोकमत’ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:54 IST

‘डोक्याला शॉट’ या वेगळ्या नावाच्या मराठीचे तमिळ फ्यूजन असलेल्या विनोदी सिनेमाच्या कलावंतांनी सोमवारी (दि. २५) ‘लोकमत’च्या कोल्हापूर कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला.

ठळक मुद्दे‘डोक्याला शॉट’ मराठी सिनेमाच्या कलाकारांनी दिली ‘लोकमत’ला भेटदिग्दर्शक आणि प्रमुख कलावंतांनी ‘लोकमत’शी साधला संवाद

कोल्हापूर : ‘डोक्याला शॉट’ या वेगळ्या नावाच्या मराठीचे तमिळ फ्यूजन असलेल्या विनोदी सिनेमाच्या कलावंतांनी सोमवारी (दि. २५) ‘लोकमत’च्या कोल्हापूर कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला.या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि प्रमुख कलावंतांनी सोमवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. मूळचा कोल्हापूरचाच असलेला रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या प्रमुख अभिनेत्यांसह सिनेमाचे दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी या सिनेमाचा प्रवास उलगडला. या सिनेमाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. प्रारंभी ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक (इव्हेंट) दीपक मनाठकर यांनी पुष्पगुच्छ देऊन या कलावंतांच्या टीमचे स्वागत केले.

‘डोक्याला शॉट’ या आगामी मराठी सिनेमाच्या कलावंतांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी  शिवकुमार पार्थसारथी, ओंकार गोवर्धन, रोहित हळदीकर आणि गणेश पंडित यांचे दीपक मनाठकर यांनी स्वागत केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)तमिळ सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) आणि मराठी अभिजित (सुव्रत जोशी) यांच्या लग्नाच्या निमित्ताने कोल्हापूरचा रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन आणि गणेश पंडित या अभिजितच्या चार मित्रांची गोष्ट असलेला ‘डोक्याला शॉट’ हा मराठी सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, ३ मार्च रोजी कोल्हापुरात प्रीमिअर शो होत आहे; यासाठी या सिनेमातील सर्वच कलाकार येत आहेत, अशी माहिती या कलावंतांनी दिली.कोल्हापूरच्या रोहितची प्रमुख भूमिकाया सिनेमात रोहित हळदीकर हा कोल्हापूरचा युवक झळकला आहे. रोहितने यापूर्वी अनेक नाटकांत काम केले आहे, तसेच काही सिनेमेही केले आहेत. तो म्हणाला, एका वेगळ्या जॉनरचा हा सिनेमा आहे. ओंकार गोवर्धन याने यातील एका मित्राची भूमिका साकारली आहे. युवकांच्या मनातील काही गोष्टी या सिनेमातून मांडल्याचे तो म्हणाला.सिनेमाचे शीर्षक गाणे हिंदीतील दिग्गज गायक मिका सिंगने गायिले आहे, तर जोरूका गुलाम हे पार्टी गाणे हिंदीतीलच कैलास खेर यांनी गायिले आहे. या सिनेमात चार गाणी असून, दोन प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला मिळणार आहेत, तर दोन प्रमोशनल साँग्ज आहेत. अमितराज, श्रीकांत-अनिता या दोन संगीतकारांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. याशिवाय हिंदीतील दिग्गज गायक मिका सिंग, कैलास खेर यांनीही या सिनेमातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ‘जोरू का गुलाम’ आणि ‘डोक्याला शॉट’ या गाण्यालाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर