शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

प्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:18 IST

Suicide Kolhapur- दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले. करवीर तालुक्यात घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.

ठळक मुद्देप्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना आईबाबांनी तुम्हाला घडविले ते याचसाठी का..

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले.  घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.आईवडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले ते हे दिवस पाहण्यासाठीच का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.मुलगी अतिशय हुशार. दहावीत ९२ टक्के गुण मिळालेले. अत्यंत धाडसी व जीवनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगणारी. एक भाऊ व बहीण शिक्षण घेत असलेले.

कौटुंबिक स्थिती तशी बेताची; परंतु आईवडिलांनी अत्यंत कष्टातून तिला घडविले. दिसायला सुंदर आहे. चांगले करिअर केलेस तर कुठेही चांगले स्थळ येईल, अशी त्यांची भावना. एसटीतून प्रवासाचा त्रास नको म्हणून आईनेच कोल्हापुरात मामाकडे तिला शिक्षणासाठी ठेवले. अकरावीतही तिने चांगले गुण मिळविले. याच दरम्यान गावात दोन घटना घडल्या. एकाच आठवड्यात दोन प्रेमविवाह झाले. त्याचदरम्यान निपाणीजवळचे एक चांगले स्थळ मुलीला आल्यावर गेल्या रविवारी मुलीचे लग्न ठरवून ठेवले.मुलाची कौटुंबिक स्थिती सधन. वडील सहकारी संस्थेत नोकरीस. मुलगा एकुलता. कुटुंबालाही त्याच्याबद्दल कमालीचा अभिमान. उंचापुरा व भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा.. त्याने लष्करात जावे म्हणून त्याप्रकारचे प्रशिक्षण सुरू असलेले. वडिलांना तर मुलाची केवढी हौस. गेल्याच आठवड्यात शब्द टाकल्यावर वडिलांनी नवी कोरी बुलेट दारात आणून उभी केली.

एवढे जिवापाड प्रेम करणारे आईवडील असूनही त्यानेही त्याचे प्रेम त्यांच्याजवळ व्यक्तच केले नाही. मुलीचे लग्न ठरल्याचे समजल्यावर दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला व दिलेल्या शब्दानुसार दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला विष घेऊन जीवन संपविले. मुलगा आधी गेला व मुलगी त्यानंतर.. परंतु दोघांचाही शेवट एकच.. दोन उमलणारी फुले अकालीच कोमेजून गेली. या मार्गाने तुम्ही जाऊ नका असे त्यांना मायेने जवळ घेऊन सांगणारे कोणच भेटले नसेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भले कुटुंबाचा विरोध होता तर दोघांनाही पळून जाऊन लग्न करण्याचा सोपा पर्याय हाताशी होता. ते जमणार नव्हते तर किमान आईवडील, मित्र, जवळचे नातलग यांच्याकडे प्रेमाची भावना व्यक्त करता आली असती. त्यातून चर्चेतून सहज मार्ग निघू शकला असता; परंतु तसे काहीच न करता एकदम टोकाला जाऊन ज्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे करण्यासाठी कष्ट उपसले, तुमच्यावर जिवापाड प्रेम केले, त्यांना आयुष्यभराचे दु:ख देऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने निघून गेलात.. कधीच परत न येण्यासाठी... हा अधिकार तरी मग तुम्हाला कुणी दिला..?

आणखी एक घटना पन्हाळा तालुक्यातील नेबापूर गावची. प्रेम प्रकरणातून विष प्राशन करून नेबापूरच्या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेतीवर फवारणी करणारे विषारी तणनाशक प्राशन करून या युवकाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. वडीलांचे छत्र नव्हते, लहान बहीण आणि आईसोबत तो रहात होता. सेंट्रिंग काम करत घर चालले होते. प्रेमात अपयश आले म्हणून त्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केेले. परंतु बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आता त्या विधवा आईने कोणाकडे पहायचे नवे आव्हान...ही घटना एका गावातील असली, तरी अन्य गावांतील सामाजिक स्थिती याहून वेगळी नाही. कुटुंब व्यवस्थेतील नवे आव्हान म्हणून पालकांनी त्याकडे पाहिले पाहिजे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, दुरावलेले नातेसंबंध, जातीपातीची घट्ट होत चाललेली भावना अशी अनेक कारणे या घटनांच्या मुळाशी आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याkolhapurकोल्हापूर