शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय ?, राजू शेट्टींची विचारणा

By समीर देशपांडे | Updated: October 7, 2024 17:52 IST

'शरद पवारही आतून तिकडचे'

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ दोन, अडीचशे घराण्यांमध्येच सुरू आहे. त्या पलिकडे सामान्य परंतु नेतृत्व करू शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना सोबत घेवून आम्हांला या घराण्यापलिकडे राजकारण न्यायचे आहे. आघाडी आणि युती'त आलटून, पालटून दोन्हीकडे तीच तीच माणसे दिसतात. त्यामुळेच आम्ही हा तिसरा पर्याय काढला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.साखर हंगामाबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या ऊसाला अजूनही २०० रूपये मिळावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. गेल्यावर्षभरात साखरेचे भाव ३६०० रूपयांपर्यंत राहिले आहेत. मोलॅसिस, इथेनॉल, बगॅसचे दरही वाढले. त्यामुळे माळेगाव, विठ्ठल साखर कारखान्याला जर ३६०० रूपये देता येतात तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या धनदांडग्या साखर कारखानदारांना काय धाड मारली आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 'कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय' १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायचे असताना बॉयलर पेटले आहेत. त्याआधी कारखाने सुरू झाले तर नियमाप्रमाणे रोज प्रतिटन ५०० रूपयांचा दंड सरकारने वसूल केला पाहिजे. अन्यथा कारखानादार आमचे ऐकत नाही असे सरकारने तरी जाहीर करायला पाहिजे. कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. आम्ही काय करायचे ते ठरवले आहे. महिनाभर आधी ऊस परिषद घेत आहोत. नाही तरी आम्ही ऊसाचा बुडका तयार ठेवलाच आहे असे ते म्हणाले.'शरद पवारही आतून तिकडचे'हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते आणि ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळ इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीGovernmentसरकारSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण