शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

हळदीतील शिवस्मारकाचे काम दोन वर्षे रखडले : निधीची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:52 IST

सडोली (खालसा) : कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे

ठळक मुद्देकासवगतीने काम सुरू; पंचवीस लाखांचा प्रस्तावित खर्च, मदतीचे आवाहनस्वत:हून सर्व अतिक्रमणे काढून घेतली आणि स्मारकाच्या जागेचा मार्ग मोकळा झाला.

दीपक मेटील ।सडोली (खालसा) : कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. लोकसहभागातून स्मारकाचे कामही सुरू झाले, मात्र निधीअभावी हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.

हळदीतील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवविचाराने प्रेरित होऊन गावात शिवस्मारक उभारण्याचा निर्धार केला. कोल्हापूर- राधानगरी रोडवरील शिवाजी चौकातील जागेवर शिवस्मारक उभारण्यापाठीमागचा आपला प्रामाणिक हेतू व उद्देश लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न मंडळाने सुरू केला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी जागेसाठी जगद्गुरू शंकराचार्य यांची भेट घेऊन स्मारकासाठी मठाच्या मालकीच्या जागेची मागणी केली. शंकराचार्य यांनीही स्मारकासाठी मठाच्या मालकीची पाच गुंठे जमीन शिवाजी चौक तरुण मंडळाच्या नावावर करून दिली. त्यानंतर जागेवर अतिक्रमणे केलेल्या फेरीवाले व दुकानदारांना मंडळाने आवाहन केले, तेव्हा त्यांनी स्वत:हून सर्व अतिक्रमणे काढून घेतली आणि स्मारकाच्या जागेचा मार्ग मोकळा झाला.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचा पदस्पर्श हळदी गावाला झाल्यामुळे मोठी ऐतिहासिक परंपरा गावाला लाभली असल्याची नोंद असल्याने या गावाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाजी चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून स्मारकाच्या कामास सुरुवात केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सहकारी संस्था, व्यक्ती यांनी यासाठी आर्थिक सहकार्य देऊ केले. त्यातून कामास प्रारंभही झाला.दहा फूट उंचीचा दगडी चबुतरा बांधण्यात आला आहे. अन्य लहान - मोठी कामे करण्यात आली आहेत. शिवरायांच्या पूर्णाकृती सव्वासात फूट उंचीच्या पुतळ्यासाठी सव्वा लाख रुपयांची अ‍ॅडव्हान्स देण्यात आली आहे. स्मारकाच्या सभोवती कंपाऊंड वॉल, हायमॅक्स लॅम्प, बोअर, पेव्हिंग ब्लॉक, आकर्षक गार्डन, आदी कामे करण्यात येणार आहेत. आतापर्यंत मंडळाकडून सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च झाले आहेत. या स्मारकाच्या नियोजित आराखड्याप्रमाणे अंदाजित खर्च हा २५ लाख रुपयांपर्यंतचा आहे.

स्मारकाच्या बांधकामाकरिता लागणारा खर्च पाहता मंडळाकडे जमा झालेली रक्कम व झालेला खर्च पाहता फार मोठी आर्थिक समस्याउभी राहिली आहे. स्मारकाच्या पूर्णत्वासाठी लागणाºया आर्थिक निधीची कमतरता भासू लागल्यामुळे स्मारकाचे काम कासव गतीने चालले आहे. त्यामुळे हळदी गावातील शिवस्मारक लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रांतील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हळदी गावाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी गावातील सर्व तरुणाई एकत्र आली व आपल्या ऐपतीप्रमाणे मदत केली, परंतु हे काम मोठे असल्याने सर्व स्तरातून मदत मिळाली तर हे काम पूर्णत्वास जाईल. यासाठी मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी मदत करावी.- संजय जाधव,अध्यक्ष, शिवाजी तरुण मंडळ