शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगलेमध्ये शिंदे गट उमेदवार बदलणार का? धैर्यशील मानेंनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:54 IST

Hatkanangle Lok Sabha Election : शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे .

Hatkanangle Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये उमेदवार यादी जाहीर झाली असून काही जागांसाठी अजूनही बैठका सुरू आहेत. दरम्यान, शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, यावर खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली. 

Hatkanangle Lok Sabha Election : 'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'; धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींवर हल्लाबोल

"शिरसाट यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कुठेही उमेदवार बदलणार असल्याचे संकेत  दिलेले नाहीत. त्यांनी असं सांगितलं आहे की, बदलायचे असेल तर मला अशी कोणतीही कल्पना नाही. पण, बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत. हे स्टेटमेंट म्हणजे बदलण्यासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. पण, चर्चेचं उधाण एखाद्या मतदारसंघाबाबत करणे हे योग्य नाही, असं धैर्यशील माने म्हणाले. 

"शिवसेनेला जर उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याआधी बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही. मी स्वत: एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो, शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक कामात गुंतला आहे. भाजपाचे कार्यकर्तेही कामात गुंतले आहेत. आता गती घेण्याची वेळ आहे. संभ्रम करण्याची वेळ नाही, कालची बातमी एप्रिल फुल म्हणून डोक्यातून काढून टाकावी. कार्यकर्ता म्हणून जे काम करायचं आहे, त्या कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे. कामाला लागण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. माझ्या पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर हा सिग्नल दिला आहे, त्यामुळे आता या शंका काढण्यात काही अर्थ नाही, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलं. 

'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'

"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. 

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेShiv Senaशिवसेना