शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ अजूनही मोठे होतील : शिवलिंगेश्वर महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:58 IST

Hasan Mushrif kolhapurnews -राजघराण्यात जन्मूनही राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलसं केलं.त्यांच्याच लोकसेवेचे अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत. त्यामुळेच ते अजूनही मोठे होतील,असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे मठाधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.

ठळक मुद्देहसन मुश्रीफ अजूनही मोठे होतील : शिवलिंगेश्वर महास्वामी गडहिंग्लज येथील कार्यक्रमात मुश्रीफ यांच्या जनसेवेचे कौतुक

गडहिंग्लज :राजघराण्यात जन्मूनही राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलसं केलं.त्यांच्याच लोकसेवेचे अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत. त्यामुळेच ते अजूनही मोठे होतील,असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे मठाधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.येथील बेलबाग आश्रमात श्री. जडेयसिद्धेश्वर स्वामीजींच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.महास्वामीजी म्हणाले, मुश्रीफ यांचे नेतृत्व गोरगरिबांची सेवा आणि विधायक कामातून उभे राहिले आहे.शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठीही मुश्रीफ फाऊंडेशनने मोलाची मदत केली आहे.मुश्रीफ म्हणाले, मानवतावादी लिंगायत धर्माची स्थापना म. बसवेश्वर महाराजांनी केली.त्यांच्या विचारांचा प्रसार जडेयसिद्धेश्वर स्वामीजी आणि चंद्रम्मा माताजी यांनी केला.त्यांचे काम पुढे नेण्याची गरज आहे.यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम, डॉ सदानंद पाटणे, डॉ नागेश पट्टणशेट्टी, अमर चव्हाण, बाळेश नाईक, हारुण सय्यद, रमजान अत्तार, अभय देसाई, ज्योत्स्ना पताडे, सोमगोंडा आरबोळे, शेखर यरटे, सुनील शिंत्रे, दिलीप माने, उर्मिला जोशी, शुभदा पाटील, शबाना मकानदार, सुनीता नाईक, राजशेखर दड्डी, काडाप्पा हंजी, नागाप्पा कोल्हापुरे, राजेंद्र गड्याणावर, बाळासाहेब घुगरे, उपस्थित होते.मुश्रीफ मुख्यमंत्री होतील..!मंत्री मुश्रीफ यांच्यामुळेच मी राजकारणात आलो.विकास कामांबरोबरच गोरगरिबांच्या सेवेचे त्यांचे कार्य प्रचंड आहे.त्यामुळे भविष्यात ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी व्यक्त केला.आश्रमासाठी ५० लाख देणार !बेलबाग आश्रमातील नियोजित ध्यानमंदीर, वाचनालय आणि आश्रम परिसर सुशोभिकरणासाठी ५० लाखाचा निधी देण्याची घोषणा मुश्रीफ यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर