शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मेहेरबानीमुळे मुश्रीफांना पालकमंत्रीपद, समरजित घाटगेंचा आक्रमक पवित्रा कायम 

By समीर देशपांडे | Updated: October 5, 2023 13:18 IST

‘जितना बडा संघर्ष होगा, उतनीही बडी जीत होगी’

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यातील संघर्ष कायमच राहणार असून हसन मुश्रीफ यांना भाजपच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद मिळाले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा घाटगे यांनी गुरूवारी मुश्रीफ यांना दिला आहे.मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांनी घाटगे यांची भेट घेतली असता ते म्हणाले, मी त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो. याआधी ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर अतिशय कटू शब्दात टीका करत होते. आम्हांला जातीयवादी असल्याचे म्हणत होते. त्याच भाजपच्या मेहेरबानीमुळे, कृपेमुळे ते पालकमंत्री झाले आहेत.त्यांची मनमान चालणार नाही. भाजपच्या चौकटीत राहून त्यांना काम करावे लागेल. जेव्हा ही चौकट मोडेल तेव्हा मी त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. कागलमध्ये आमच्यात संघर्ष अटळ असून कागलमध्ये स्वराज्य येणं अटळ आहे. ‘जितना बडा संघर्ष होगा, उतनीही बडी जीत होगी’ अशा शब्दात घाटगे यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे