शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ईडीने उचलले, मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? 

By विश्वास पाटील | Updated: February 2, 2023 18:12 IST

बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी एकत्र झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली व अधिकाऱ्यांना बाहेर नेण्यास विरोध केला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए.बी.माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांनी ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी उचलले. त्यांना ताब्यात घेवून पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. त्यास कर्मचारी संघटनेने विरोध केल्याने बँकेच्या आवारात कमालीचा तणाव निर्माण झाला.ईडीच्या पथकातर्फे बँकेची बुधवारपासून तपासणी सुरु आहे. या बँकेचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळात बँकेने कांही साखर कारखान्यांना चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवला आहे. ईडीच्या अठरा अधिकाऱ्यांचे पथक बँकेत ठाण मांडून आहे. त्यांनी बुधवारी रात्री अधिकाऱ्यांनाही घरी जावू दिले नव्हते. मुख्य कार्यालयाशिवाय काही शाखांचीही झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक आर.जे.पाटील यांच्यासह अन्य तिघांना समन्स बजावून ताब्यात घेण्यात आले. साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करणारा विभाग, बिगर कर्ज या शाखेचे हे अधिकारी आहेत.बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी एकत्र झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली व अधिकाऱ्यांना बाहेर नेण्यास विरोध केला. परंतू पोलिसांच्या बंदोबस्तात या अधिकाऱ्यांना मुंबईला हलवण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. बँकेच्या इतिहासात प्रथमच अशी कारवाई झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbankबँक