शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दातृत्वाचे हात उदंड

By admin | Updated: October 16, 2016 00:33 IST

अनेकजण सरसावले : मोर्चामार्गावर चॉकलेट, अल्पोपाहार, पाणी, कोकमचे वाटप

ंकोल्हापूर : ऐतिहासिक मराठा क्रांती मूक मोर्चात जशी मराठा समाजाची एकजूट दिसली, तसेच यानिमित्ताने मुस्लिम बांधवांसह विविध अन्य जातिधर्मांच्या दातृत्वाचे हजारो हातही मार्चेकऱ्यांना खाऊ घालताना दिसून आले. चॉकलेटपासून भडंग, पाणी, ताक, शीतपेये, अल्पोपाहार, खाद्यवस्तू वाटपातून मोर्चेकऱ्यांची तहानभूक शमविण्याची सेवा करण्यासाठी अनेक जातिधर्मांच्या बंधू-भगिनी सरसावल्या. मोर्चात सहभागी होताना घरातून भाजी-भाकरी, पाण्याची बाटली घेऊन येण्याचे संयोजकांतर्फे जरी आवाहन केले असले, तरीही स्वत:ची जबाबदारी समजून अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्था यांनी मोर्चेकऱ्यांसाठी यथाशक्ती अल्पोपाहार, पाण्याची सोय केली. जिल्ह्यातून तसेच परराज्यांतूनही नागरिक पहाटेपासून येत होते. काहीजणांनी तर शुक्रवारी रात्रीच मुक्काम ठोकला होता. त्यांच्या अल्पोपाहाराची सोय करण्यासाठी अनेकांचे हात सरसावले होते. शहरात येणाऱ्या नऊ एंट्री पॉइंटवर पाणी, ताक, सरबत, कोकम, व्हेज पुलाव, केळी यांची सोय होती. ‘आॅक्टोबर हीट’मुळे कासाविस झालेल्या मोर्चेकऱ्यांमध्ये काहीजणांनी ग्लुकॉन-डी पावडरीचे वाटप केले. नागरिक जेवढ्या शिस्तीत अल्पोपाहार घेत होते, तेवढ्याच शिस्तीने ते मोकळ्या प्लेट्स ठेवत होते. कोठेही बेशिस्तीचे दर्शन झाले नाही. (प्रतिनिधी) गोकुळ : ‘गोकुळ’ दूध संघातर्फे शहरामध्ये विविध अकरा ठिकाणी संघाने पाण्याचे दहा टॅँकर उभे केले होते. कावळा नाका येथील वीरशैव बॅँकेसमोर ताकाच्या वीस हजार पिशव्यांचे वाटप झाले. सिंधी समाज : सिंधी समाजातर्फे महाद्वार रोड, शिवाजी पूल, ताराराणी चौक या परिसरात ५० हजारांहून अधिक पाण्याच्या पिशव्या वाटल्या. निर्माण अ‍ॅल्युमिनियम व छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ : निर्माण अ‍ॅल्युमिनियम व संभाजीनगर तरुण मंडळातर्फे संभाजीनगर येथे तपोवन मैदानाकडून येणाऱ्या नागरिकांसाठी अल्पोपाहार व पाणीवाटप केले. शाहू महाराज फेरीवाले संघ : या संघातर्फे चारशे किलो व्हेज पुलाव व पाणीवाटपाचे नियोजन केले होते. न्यू कॉलेज : न्यू कॉलेजतर्फे तपोवन मैदानावर व्हेज पुलावाचे वाटप केले. याचे संयोजन शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, प्राचार्य एन. व्ही. नलवडे यांनी केले होते. यामध्ये प्राध्यापकांसह दीडशे कर्मचारी सहभागी होते. शिवशक्ती तरुण मंडळ : फोर्ड कॉर्नर येथे शिवशक्ती तरुण मंडळातर्फे कोकम व पाणीवाटप केले. तसेच एस. व्ही. एंटरप्रायझेसतर्फेही व्हीनस कॉर्नर येथे पाचशे कॅन पाणी वाटले. सिद्धी होम अ‍ॅप्लायन्सेस : कळंबा जेल रोडवर सिद्धी होम अ‍ॅप्लायन्सेसतर्फे चहा वाटप झाले. कोल्हापूर सराफ संघ : सराफ संघातर्फे एक लाख पाण्याच्या पिशव्यांचे वाटप केले. मुस्लिम समाज, उत्तरेश्वर-शुक्रवार पेठ : गंगावेश चौकात पाण्याचे वाटप केले. जुना बुधवार तालीम मंडळ : जुना बुधवार चौकात शिवाजी पुलाकडून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी पाणीवाटप केले. विजयकुमार भोसले-सरकार : यांच्याकडून वडणगे फाटा येथे दोन टन केळींचे वाटप केले, त्याचबरोबर विविध ठिकाणीही केळींचे वाटप केले. वडणगे मुस्लिम समाजातर्फे वडणगे फाटा येथे पाण्याचे वाटप. जैन श्वेतांबर समाज : जैन श्वेतांबर, गुजराती समाजातर्फे १५ हजार पाण्याच्या बाटल्या वाटल्या. ओमकार गु्रप : पाचगाव येथील ओमकार गु्रपतर्फे ठिकठिकाणी दोन लाख बुंदीच्या लाडूंचे वाटप केले. रंकाळा तालीम : रंकाळा तालीम मंडळाने रंकाळा टॉवर येथे अल्पोपाहार वाटप केले. संकटमोचन मारुती मंदिर : संकटमोचन मारुती मंदिराच्या कार्यकर्त्यांतर्फे स्टेशन रोडवर दोन हजार किलो मसाला भाताचे वाटप केले. लक्ष्मी मिनरल : लक्ष्मी मिनरल वॉटरतर्फे शिरोली नाका येथे पाणीवाटप केले. अंबाबाई हक्कदार श्रीपूजक : करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजकांतर्फे दहा हजार पाण्याच्या पाऊचचे वाटप केले. सरकारप्रेमी संस्था : सरकारप्रेमी सेवाभावी संस्थेतर्फे देवकर पाणंद व कळंबा पेट्रोल पंप येथे दहा हजार लाडू व केळी यांचे वाटप झाले. दिगंबर जैन बोर्डिंग : दिगंबर जैन समाज, सहयोगी युवक मंडळ, भगवान महावीर प्रतिष्ठान व जैन सेवा संघ यांच्यातर्फे दसरा चौकात सिंटेक्स टाकीत सरबत करून पाईपलाईनद्वारे नागरिकांना वाटप करण्यात आले. महाडिक गु्रप : आमदार अमल महाडिक यांच्यातर्फे शिरोली पेट्रोल पंपावर पाणीवाटप झाले. मैत्रीण फौंडेशन : मैत्रीण फौंडेशनतर्फे हॉकी स्टेडियम, शारदा विहार, संभाजीनगर कॉर्नर, विश्वपंढरी येथे नगरसेवक किरण नकाते व माजी नगरसेविका माधुरी नकाते यांनी दीड लाख पाण्याचे पाउच, साडेतीनशे पाण्याच्या बाटल्यांच्या बॉक्सचे वाटप केले. विठ्ठल-रुक्मिणी मंडळ : शाहू मार्केट येथे विठ्ठल-रुक्मिणी मंडळातर्फे तीनशे किलो शाबू खिचडी, दोनशे किलो मसालेभात, पन्नास किलो खडीसाखरेचे वाटप केले. बाजार समितीचे संचालक कृष्णात पाटील, सचिव विजय नायकल, संजय पोवार-वाईकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील कोळी यांच्या उपस्थितीत वाटप केले. ग्रीन पार्क : येथील नागरिकांच्या वतीने शांतिनिकेतन शाळेसमोर सुमारे पाच हजार प्लेट पोहे व चहाचे वाटप करण्यात आले. शिवाजी मंडळ : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने पाण्याच्या पाच लाख बाटल्यांचे वाटप केले. संजय पाटील फौंडेशन ग्रुप : महावीर कॉलेजसमोर घुणकी येथील उद्योजक संजय पाटील यांच्या फौंडेशन ग्रुपतर्फे उप्पीट आणि बिसलरी पाण्याचे वाटप केले.