शिवाजी विद्यापीठ रोडवरील अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 09:42 AM2021-03-10T09:42:20+5:302021-03-10T09:44:47+5:30

Shivaji University Kmc Kolhapur- केएसबीपी नेचर पार्क ते श्यामचा वडा या शिवाजी विद्यापीठ रोडवरील अतिक्रमणावर मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. येथे ३८ मोठ्या झाडांची कत्तल करून हातगाड्या लावण्यात आल्या होत्या.

Hammer on encroachment on Shivaji University Road | शिवाजी विद्यापीठ रोडवरील अतिक्रमणावर हातोडा

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ रोड येथील अतिक्रमण केलेल्या हातगाड्या मंगळवारी जप्त करण्यात आल्या.

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ रोडवरील अतिक्रमणावर हातोडा चार हातगाड्या हटवल्या : झाडे तोडून केबिनचे अतिक्रमण

कोल्हापूर : केएसबीपी नेचर पार्क ते श्यामचा वडा या शिवाजी विद्यापीठ रोडवरील अतिक्रमणावर मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. येथे ३८ मोठ्या झाडांची कत्तल करून हातगाड्या लावण्यात आल्या होत्या.

त्या हातगाड्या अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आल्या. गार्डन विभागाला कळवून झाडे तोडण्यात आलेल्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. सोमवारी पोलीस बंदोबस्तामध्ये येथील इतर अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.

गार्डन विभागाचे दुर्लक्ष

येथील झाडे तोडल्याप्रकरणी महापालिकेच्या गार्डन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने याबाबत माहिती देण्यासाठी गार्डन सहायक अधीक्षक यांना फोन केला असता. त्यांनी फोन उचलला नाही.

 

Web Title: Hammer on encroachment on Shivaji University Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.