शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

जयसिंगपुरात अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: January 23, 2015 00:37 IST

नगरपालिकेची कारवाई : शाहूनगर बेघर वसाहतीमधील तीन भूखंड केले अतिक्रमण मुक्त

जयसिंगपूर : शहरातील बेघर वसाहतीमधील नगरपालिका मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस बंदोबस्तात आज, गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून लाकूड वखारीचे व जनावरांच्या गोट्याचे अतिक्रमण काढण्यात आले.शाहूनगर बेघर वसाहतीत नगरपालिकेच्या मालकीचे रिकामे भूखंड आहेत. त्यावर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या. याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर आज मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग, बांधकाम, आरोग्य व विद्युत विभागाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. पोलीस बंदोबस्तामध्ये नगरपालिका भूखंड क्रमांक १८४ वरील रामकृष्ण कोरवी व बशीर नदाफ यांनी केलेली लाकूड वखार व जनावरांच्या गोट्याचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. तसेच भूखंड क्रमांक ४६३ वरील लोखंडी अ‍ॅँगलचे वाहन पार्किंग शेडही काढून तिन्ही प्लॉट रिकामे करण्यात आले.अतिक्रमण हटाव मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन अधिकारी जावेद मुल्ला, कनिष्ठ अभियंता राजेंद्र गवळी, सहायक मिळकत व्यवस्थापक विजय पाटील, स्वच्छता पर्यवेक्षक रमेश कांबळे यांच्यासह आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, नगरपालिकेच्यावतीने प्लॉटवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू राहणार असून, बेघर वसाहत येथील प्लॉटवरील अतिक्रमणे नागरिकांनी स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)