शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

सोन्याच्या दागिन्यांना सक्तीचे; कायद्याची अंमलबजावणी २०२१ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:31 IST

तत्पूर्वी सर्व सराफ व्यावसायिकांनी आपल्याजवळील अलंकारांचा स्टॉक संपवून जानेवारी महिन्यात हॉलमार्कचे दागिने लावावेत, असे निर्देश दिले आहेत. या कायद्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे.

ठळक मुद्देहॉलमार्कने ग्राहकांच्या फसवणुकीला आळा - तालुक्यांमध्ये सेंटरची गरज

इंदुमती गणेश।कोल्हापूर : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी आणलेल्या नव्या हॉलमार्क कायद्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची तूट आणि घटीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. मात्र, या कायद्याची योग्यरितीने अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी हॉलमार्क सेंटर सुरू करण्याची गरज आहे.

भारतात सोन्याच्या अलंकारांना असलेली मागणी आणि ग्राहकहित लक्षात घेऊन केंद्र सरकारने नुकताच १४, १८ व २२ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क सक्तीचे केले आहे. या कायद्याची अंमलबजावणी जानेवारी २०२१ पासून होणार आहे. तत्पूर्वी सर्व सराफ व्यावसायिकांनी आपल्याजवळील अलंकारांचा स्टॉक संपवून जानेवारी महिन्यात हॉलमार्कचे दागिने लावावेत, असे निर्देश दिले आहेत. या कायद्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे.

सध्या ब्रँडेड शोरूम व नामांकित सराफ व्यावसायिकांकडून हॉलमार्कचे दागिने विकले जातात. बाकी हा सगळा व्यवसाय विश्वासावर चालतो. या कायद्यामुळे विश्वासाला हॉलमार्कच्या रूपाने सरकारी प्रमाणपत्रच मिळणार आहे. अनेक सराफ व्यावसायिक प्रामुख्याने ग्रामीण भागात १५ ते १८ कॅरेटचेच दागिने बनवितात, मात्र रक्कम २४ कॅरेटची घेतली जाते. पुढे दागिना तुटल्यानंतर किंवा विकण्याची वेळ आली की सोन्याचे वजन कमी भरते आणि ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यातही दागिना परत घेताना तूट-घट धरली जाते. त्यामुळे सोन्याचा फार कमी परतावा मिळतो. दागिन्यांवर हॉलमार्क सक्तीचे केल्याने ग्राहकांची फसगत टळणार आहे. दागिन्यांवर कॅरेटची नोंद आणि हॉलमार्क असल्याने पारदर्शी कारभार होणार आहे.

कोल्हापूर शहरात सध्या पाच हॉलमार्क सेंटर आहेत. शहराच्या ठिकाणी दागिन्यांचे हॉलमार्किंग करणे अवघड नाही; पण जिल्ह्यात अन्यत्र कुठेही सेंटर नसल्याने येथील सराफांना शहरात दागिने आणून त्यांचे हॉलमार्किंग तपासणी करून परत गावी न्यावे लागणार आहेत. प्रवासादरम्यान अलंकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हॉलमार्क सक्तीचे करताना त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॉलमार्क सेंटर सुरू करावे लागणार आहे. या कायद्याचे ग्राहकांनी व सराफ व्यावसायिकांनीही स्वागत केले आहे.

मागणी २३ आणि २४ कॅरेटलापरदेशात १४ आणि १८ कॅरेटमध्ये दागिने बनवले जातात. भारतात मात्र, २३ कॅरेटमधील अलंकारांना मागणी आहे. पाटल्या, बिलवर, चिताक, तोडे, नेकलेस, प्लेन बांगड्या असे अलंकार २३ कॅरेटमध्ये घडविले जातात. मात्र, या कॅरेटच्या दागिन्यांना हॉलमार्कच्या कक्षेत आणलेले नाही. म्हणूनच २० व २३ कॅरेटच्या अलंकारांचाही यात समावेश करावा, अशी मागणी आहे. अनेक ग्राहकांना २३ कॅरेटचे अलंकार घेणे परवडत नाही त्यामुळे कमी सोन्यात मोठे दागिने बनवून घेण्याकडे त्यांचा कल असतो. अशा लाख भरलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन कसे करणार, याबाबत स्पष्टता नाही.

आमचा हॉलमार्कला विरोध नाही, तर त्यातील जाचक अटी रद्द करा आणि धोरण स्पष्ट करा, अशी मागणी आहे. आॅल इंडिया जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी कौन्सिलच्या माध्यमातून आम्ही या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविणार आहोत.- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघकेंद्राचा हॉलमार्कचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे सराफ आणि ग्राहकांतील विश्वास अधिक दृढ होणार आहे. चोख अलंकारांचा या कायद्याच्या कक्षेत आणखी काही कॅरेटचा समावेश झाला पाहिजे.- अमोल ढणाल, सराफ व्यावसायिकदागिन्यांत शुद्धता राखण्यासाठी आणि ग्राहकांची फसगत टाळण्यासाठी केंद्राने हा कायदा केला आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांना खात्रीशीरपणे योग्य प्रतीचे सोने मिळेल.- प्रसाद कामत, सराफ व्यावसायिक,टाटा तनिष्क

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी