शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे शटर उघडे, दारात बसून व्यापार, शहरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 15:19 IST

CoronaVirus In Kolhapur : सरकारने सरसकट दुकाने उघडण्यावरील निर्बंध कायम राखल्याने सोमवारी शहरातील दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवत दारात बसून व्यापार चालू ठेवला. राजारामपुरीतील अपवाद वगळता प्रशासनानेही व्यापक आणि कडक कारवाई न करता दुकानदारांना सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. यामुळे दुकानदारांना अर्धे शटर उघडून व्यापार करण्याची मुभा मिळाली.

ठळक मुद्दे अर्धे शटर उघडे, दारात बसून व्यापार, शहरातील चित्रराजारामपुरी व्यापाऱ्यांची निदर्शने

कोल्हापूर : सरकारने सरसकट दुकाने उघडण्यावरील निर्बंध कायम राखल्याने सोमवारी शहरातील दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवत दारात बसून व्यापार चालू ठेवला. राजारामपुरीतील अपवाद वगळता प्रशासनानेही व्यापक आणि कडक कारवाई न करता दुकानदारांना सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. यामुळे दुकानदारांना अर्धे शटर उघडून व्यापार करण्याची मुभा मिळाली.दरम्यान, राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी विरोध केला. या वेळी व्यापारी आणि प्रशासन आमने-सामने आले. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून नाराजी व्यक्त केली.

शहरातील महाद्वार रोड, बिंदू चौक परिसर, सुभाष रोड, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील आदी बाजारपेठेतील सरसकट दुकाने अर्धे शटर उघडून व्यवहार पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुकानासमोर कामगार थांबवून व्यापार केला.

महापालिकेचे पथक महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी अशा ठिकाणी फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. या पथकाचे वाहन आल्यानंतर शटर बंद केले जात होते. ते गेल्यानंतर अर्धे शटर उघडून व्यवहार केले जात होते. शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत असे चित्र राहिले.

तीन महिन्यांपासून दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुकानातील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने ते विविध मार्गाने व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. समोरच्या बाजूचे अर्धे शटर उघडून तर मागील बाजूस दरवाजा असल्यास तेथून व्यापार केला जात होता.दरम्यान, सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. यास पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. दुकानदार आणि पोलीस, कर्मचारी आमने-सामने आले. दुकानदारांनी प्रशासनाच्या विरोधात राजारामपुरीतील मेन रोडवरील बिझनेस हाऊस येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.निदर्शनात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, प्रशांत पोकळे, दीपक पुरोहित, श्याम बासरणी, अनिल पिंजारी, विजय येवले, मनोज शहा, राजू जोशी, भरत रावळ, प्रफुल राठोड आदी व्यापारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर