हा जयंती उत्सव भक्तिधाम मंदिर, स्वामी शांती प्रकाश मंदिर, प्रेम प्रकाश मंदिर, गोपाल मंदिर, झुलेलाल मंदिर, साई मंदिर, गुरुनानक दरबार, या ठिकाणासह, गांधीनगरचे मुख्य बसस्थानक गुरुनानक मार्केट, शिरू चौक, या ठिकाणीही साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन, सत्संग व धार्मिक विधी करून जयंती उत्सव साजरा केला. साईबाबा मंदिरासमोरील भक्तिधाम मंदिरामध्ये श्री गुरुनानक यांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भक्तिधाम मंदिराचे सर्वेसर्वा भाईसाब हजूराणी, ग्रामपंचायत सदस्य विनोद हजुरानी, अमित हजुरानी, लक्ष्मण होतचंदानी, महेश सचदेव व सेवाधारी, भाविक, सदस्यांनी जवळपास ३००० लोकांना प्रसाद पार्सलद्वारे देण्यात आला.
फोटो ओळ-०४ गांधीनगर गुरुनानक जयंती उत्सव
गांधीनगरमध्ये कार्तिक मास आरंभ व गुरुनानक जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. (छाया बाबासाहेब नेर्ले)