शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जिल्ह्यातील आठ आमदारांकडे बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 17:59 IST

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील ...

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार बंदूकधारी आहेत. या सर्वांनी जिल्हा प्रशासनाकडून स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना घेतला आहे.आमदार आणि खासदार म्हणून निवडणूक आल्यानंतर अनेकांनी प्राधान्याने बंदुकीचा परवाना मिळविला आहे. शिक्षक मतदारसंघातून आमदार झालेले जयंत आसगावर यांनीही पंधरा दिवसांपूर्वीच परवाना घेतला आहे. तिन्ही खासदारांकडेही बंदुकीचा परवाना आहे. काही आमदार, खासदार यांच्यासह त्यांचे वडील, भावानेही बंदुकीचा परवाना घेतला आहे.

बंदूक परवाना असलेले आमदार

सतेज पाटील

पालकमंत्री सतेज पाटील, आमदार सतेज पाटील विधान परिषदेचे आमदार आणि पालकमंत्री आहेत. ते काॅंग्रेसचे नेते आहेत.

ऋतुराज पाटील

ऋतुराज पाटील दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरून आमदार झाले आहेत.

पी. एन. पाटील

पी. एन. पाटील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.

डॉ. विनय कोरे

डॉ. कोरे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

राजूबाबा आवळे

आमदार आवळे हातकणंगले मतदारसंघाचे आमदार आहेत. ते काॅंग्रेस पक्षातून निवडून आले आहेत.

प्रकाश आवाडे

आमदार आवाडे इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार आहेत. यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

हे आहेत अपवाद...

कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिरोळ मतदारसंघाचे आमदार, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे मात्र बंदुकीचा परवाना नाही.

तिन्ही खासदारांकडेही परवाना

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांच्याकडेही बंदुकीची परवाना आहे.

तुम्हालाही हवे शस्त्र..?

बंदूक परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो, हा अर्ज पोलीस प्रशासनाकडे पाठवण्यात येतो. चौकशी करून पोलीस प्रमुखांकडे अहवाल दिला जातो. तो अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी येतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMLAआमदार