शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रानडुकरावर बंदुकीचा बार, उंड्रीत ३ शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:42 IST

एक आरोपी फरार झाला

कोल्हापूर : रानडुकराची शिकार करण्यासाठी बंदुकीचा बार काढून पळून जाणाऱ्या तीन शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले. मात्र, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. हा प्रकार पन्हाळा वनपरिक्षेत्रातील मौजे उंड्री येथे शनिवारी घडला. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी मिळाली आहे.पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे जंगल कक्ष क्रमांक ८३९ मध्ये बाजारभोगाव येथील वनरक्षक आणि वनसेवक गस्त घालत असताना, जंगलात तीन शिकारी रानडुकराची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळले. बंदुकीचा बार काढल्याच्या आवाजाच्या दिशेने वनरक्षक गेले. त्यांची चाहूल लागताच पन्हाळा तालुक्यातील पुशिरे येथील युवराज दादू पाटील, अजित दिलीप पाटील आणि सुरेश विकास पाटील हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार झाला आहे.एका बंदुकीसह तीन मोटारसायकली आणि तीन मोबाइल संच, एकूण १.७५ लाख रुपयांच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आला. या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तिन्ही आरोपींना पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची वनकोठडी देण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्प) कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्राचे वनअधिकारी अजित माळी, बाजारभोगावचे वनपाल आर.एस. रसाळ, मानवाडच्या वनपाल रूपाली बुचडे, पन्हाळ्याचे वनपाल सागर पटकारे, बाजारभोगावचे वनरक्षक मच्छिद्र नवाळी, कळे येथील वनरक्षक अमर माने, पणुत्रेच्या वनरक्षक अश्विनी मदने, काळजवडेच्या वनरक्षक पूजा नरुटे, कोतोलीचे वनरक्षक बाजीराव देसाई तसेच पन्हाळ्याची आरआरटी टीम यांनी केली.