शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर जिल्ह्यात ६२ वर्षांत १४ अपक्षांना गुलाल, अपक्ष आमदारांची नावे.. जाणून घ्या

By पोपट केशव पवार | Updated: October 22, 2024 12:43 IST

पोपट पवार कोल्हापूर : निवडणुकीच्या राजकारणात पक्षाने तिकीट नाकारले तर अनेकजण स्वबळाच्या बेळकुंड्या फुगवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. ...

पोपट पवारकोल्हापूर : निवडणुकीच्या राजकारणात पक्षाने तिकीट नाकारले तर अनेकजण स्वबळाच्या बेळकुंड्या फुगवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या स्वबळाने भल्याभल्यांचे राजकारण कायमचे संपुष्टात आणल्याचा इतिहास आहे. काही ठराविक नेत्यांनी मात्र तत्कालीन परिस्थितीचा फायदा उठवत स्वबळावर गुलाल लावत राजकारणाची एक एक शिडी सर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात १९६२ पासून आजतागायतपर्यंत अशा १४ अपक्षांनी विधानसभेच्या रिंगणात यश मिळवले आहे.विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी ठरलेली असते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात डझनभर अपक्ष आपले नशीब आजमावत असतात. कोणत्याही उमेदवाराला पक्षाचे पाठबळ असले की, त्याला दहा हत्तीचे बळ येते. निवडणूक प्रचार यंत्रणेपासून ते कार्यकर्त्यांपर्यंतची मदत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला नेहमीच मिळते. शिवाय उमेदवारापेक्षाही पक्ष कोणता हे पाहून अनेकजण मतदान करत असतात. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. पण यातूनही उमेदवारी न मिळाल्याने काहीजणांनी अपक्ष रिंगणात उतरून वादळात दिवा लावला आहे. ज्यांनी हे अपक्ष उभा राहून जिंकण्याची किमया साधली यातील बहुतांशजणांनी जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे सतेज पाटील, राजू शेट्टी, के. पी. पाटील, प्रकाश आवाडे यांनी अपक्ष उमेदवारी करत गुलाल अंगावर घेतला.

१९९५-२००४ ला तीन अपक्ष विधानसभेत१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत चंदगडमधून भरमूअण्णा पाटील, राधानगरीतून नामदेवराव भोईटे व शाहूवाडीतून संजयसिंह गायकवाड हे तिघे अपक्ष निवडून आले होते. भरमूअण्णांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्याने शेवटच्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. तर २००४ मध्येही करवीरमधून सतेज पाटील, भुदरगड-राधानगरीमधून के. पी. पाटील व शिरोळमधून राजू शेट्टी हे तिघे अपक्ष विधानसभेत गेले होते.

मंडलिक एकमेव अपक्ष खासदारराष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात अपक्ष उडी घेत विजय मिळवला होता. जिल्ह्याच्या इतिहासात ते एकमेव अपक्ष खासदार ठरले आहेत. राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार संभाजीराजे यांचा त्यांनी पराभव केला.हे आहेत अपक्ष जिंकलेले आमदारउमेदवार  -  मतदारसंघ  -  साल            सदाशिवराव मंडलिक - कागल   - १९७२कृष्णाजी मोरे -   राधानगरी  -  १९७२विठ्ठलराव चव्हाण- पाटील (व्ही.के) -  चंदगड  -  १९७८विक्रमसिंह घाटगे   - कागल  - १९७८यशवंत एकनाथ पाटील  -  पन्हाळा   -  १९८०संजयसिंग गायकवाड  -  शाहूवाडी   - १९८५भरमूअण्णा पाटील   -  चंदगड  -  १९९५संजयसिंग गायकवाड -  शाहूवाडी -  १९९५नामदेवराव भोईटे  - राधानगरी  -  १९९५के. पी. पाटील  - राधानगरी   - २००४सतेज पाटील  -  करवीर  - २००४राजू शेट्टी   - शिरोळ  - २००४राजेंद्र पाटील-यड्रावकर  - शिरोळ   -  २०१९प्रकाश आवाडे   -   इचलकरंजी २०१९

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण