शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीची वेबसाईट झाली ‘गुल’, ‘हेल्पलाईन’ही बंद : कसबा बावड्यातील मुल्लाणी कुटुंबीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:17 IST

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली  वेबसाईट ओपनच होत नाही तर ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद आहे. त्याचा फटका कसबा बावड्यातील मुल्लाणी कुटुंबियांना बसला आहे.

ठळक मुद्देमतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली  वेबसाईट ओपनच होत नाही ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली  वेबसाईट ओपनच होत नाही तर ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद आहे. त्याचा फटका कसबा बावड्यातील मुल्लाणी कुटुंबियांना बसला आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून ३ आॅक्टोबर ते १५ डिसेंबर २०१७ या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी आॅनलाईनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्याचा संदर्भ घेत कसबा बावड्यातील नेजदार कॉलनी येथील झाकीर मुल्लाणी यांनी आपली मुलगी समरीन हिच्या मतदार यादीतील नावातील, जन्मतारखेतील व घरच्या पत्त्याच्या दुरुस्तीसाठी आपल्या मोबाईलवरुन वेबसाईटद्वारे प्रयत्न केला; परंतु ती ओपनच झाली नाही.

तब्बल दोन तास झाकीर मुल्लाणींसह त्यांची मुलगी व मुलानेही प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही बंद होता.

त्यामुळे त्यांनी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी तुम्ही महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील कार्यालयात जाऊन क्रमांक ८ चा फॉर्म भरून नावात, जन्मतारखेत व पत्त्यात दुरूस्ती करून घ्या, असे सांगितले.

जर या ठिकाणी जाऊनच दुरुस्ती करायची असेल तर मग वृत्तपत्रात जाहिरात देऊन आॅनलाईनद्वारे मतदार नोंदणी व दुरुस्ती करा, असे आवाहन का करण्यात येत आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर