शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Gudi Padwa 2018: गुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी पन्हाळगडाजवळील गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 20:40 IST

नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे.

ठळक मुद्देगुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्दऐतिहासिक संदर्भ : गुढीपाडव्याला मोठी मागणी

संदीप आडनाईककोल्हापूर : नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे.पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे (मानगुडे) गावातून पन्हाळगडावर गुढीसाठी लागणाऱ्या मेसकाठ्या किंवा चिवे आणले जाते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात सर्वाधिक चिव्याची बेटे आहेत. शिवाय येथील चिवे हिरवेगार, सरळ आणि सर्वाधिक उंचीचे असतात. साधारण तीस ते ३५ फुट उंच असलेल्या येथील चिवे किंवा मेसकाठ्या गुढीसाठी आजही प्राधान्याने वापरल्या जातात. या गावचा इतिहासही रंजक आहे.

(छाया : नितीन भगवान, पन्हाळा) 

मानगुडेची लोकसंख्या अवघी सहाशेपन्हाळ्यावरील तीन दरवाजा मार्गे गडाखाली उतरले की गुढे हे गाव प्रथम लागते. अवघी ६00 लोकसंख्या असलेले हे गाव सोमवारपेठ ग्रुप ग्रामपंचायतीशी जोडलेले आहे. या गावचे खरे नाव मान गुडे असे आहे. या गावात कदम कुटूंबियांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. गायकवाड आणि चिखलकर ही वेगळी आडनावे असलेली दोनच घरे येथे आहेत. परंतु येथील घरे ग्रामस्थांच्या स्वमालकीची नाहीत. दर्गाहसाठी इनाम मिळालेल्या जमिनी येथील ग्रामस्थ कसून उपजिविका करतात.मानाच्या काठीसाठी मानगुडे प्रसिध्दमानगुडे गावाला मोठा इतिहास आहे. शिवरायांच्या काळात आणि नंतर छत्रपतींची राजधानी पन्हाळ्यावर असताना याच गावातील मेसकाठ्या गुढीसाठी वापरले जाई. आजही हे गाव याचसाठी पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. शिवाय गावाला इनामजमिनींने वेढलेले आहे. त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. इसवीसन १५५८ मध्ये आदिलशहा याने पन्हाळगडावरील संत हजरत पीर शाहोदोद्दीन कतालवली यांना पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेली ही १0६ एकर जमीन इनाम दिली. म्हणून या गावाला मानगुडे असेही म्हणतात. आजही त्यांच्या नावानेच या गावचा सातबारा आहे. सध्या त्याचा कारभार ट्रस्टमार्फत होतो.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यामध्ये गुढीसाठी लागणारे चिवे किंवा मेसकाठ्या मिळतात. प्रामुख्याने पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यातील बहुतेक गावांत ही चिव्यांची बेटे आहेत. या गावातील स्थानिक शेतकरी गुढीसाठी परिपक्व झालेले चिवे किंवा मेसकाठ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी विक्रीसाठी आणतात. ग्रामीण भागात ५0-६0 रुपयांना मिळणारी ही गुढीची मेसकाठी आता ७0-८0 रुपयांपर्यंत मिळते.

असे म्हटले जाते की, पूर्वी छत्रपतींची राजधानी असताना पन्हाळगडावर राहणाऱ्या सरदारांच्या घरी, वाड्यावर मानाची गुढी उभारण्यासाठी लागणारे चिवे किंवा मेसकाठ्या याच मानगुडे गावातून मागविले जात. याशिवाय युध्दकाळात किंवा लढाईच्या वेळी राजांचे सन्मानचिन्ह म्हणून किंवा पताका, झेंडा लावण्यासाठी लागणाऱ्या काठ्या याच गावातून पुरविल्या जात. म्हणून कदाचत या गावाला गुडे (मानगुडे) असे पडले असावे.अमर आडके, दुर्ग अभ्यासक 

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८kolhapurकोल्हापूर