गुरुवार सायंकाळी पावसाबरोबर पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ सुरूच राहिल्याने गुडाळवाडी येथील नागरिकांनी स्थलांतरित होण्यास सुरूवात केली.शुक्रवारी पहाटेपर्यंतही स्थलांतराचे काम सुरूच होते. छप्पन्न कुटुंबांपैकी बहुतांशी कुटुंबीयांनी गुरेढोरे व जीवनावश्यक साहित्यासह गावापासून जवळच असणाऱ्या उंच टेकडीवरील गुडाळेश्वर मंदिर, अंगणवाडी इमारत या ठिकाणी तर काहीजणांनी पै-पाहुण्यांकडे आश्रय घेतला.मा त्र झपाट्याने वाढणारे पुराचे पाणी व अंधारी रात्र यामुळे अनेकांचे प्रापंचिक साहित्य घरातच राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान गुडाळ येथील नदीकाठावरील दहा कुटुंबांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह अन्य ठिकाणी आश्रय घेतला. आज जरी पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरण भरण्यास काही फूट पाणी कमी आहे. धरण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजातून होणाऱ्या विसर्गामुळे पूरस्थिती पुन्हा एकदा गंभीर होऊन अन्य कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागण्याची शक्यता आहे.
सोबत फोटो...... गुडाळवाडी येथे महापुराचे आलेले पुराचे पाणी.
छाया / रमेश साबळे