शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने स्वीकारले अनाथ तनिष्काचे पालकत्व

By admin | Updated: November 17, 2015 00:44 IST

--गुड न्यूज--इंग्रजी शाळेत लोअर के.जी.मध्ये शिकत असून, तिला उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न कक्ष अधिकारी बाजीराव पाटील पूर्ण करणार

नंदकुमार ढेरे -- चंदगड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बाजीराव धोंडिबा पाटील यांनी आरोग्य सेवा बजावत असताना चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आरोग्यसेविका कविता सदानंद देसाई (रा. चंदगड) यांची कन्या तनिष्का देसाई हिचे पालकत्व स्वीकारून उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली असून, तिच्या शिक्षण व विवाहासाठी विविध शासकीय योजना व विम्यासह रुपये ६ लाखांचे सुरक्षा कवचही उपलब्ध करून दिल्याने मातेच्या आकस्मिक मृत्यूने निराधार बनलेल्या तनिष्का हिला पाटील यांच्या सहकार्यामुळे मोठा आधार मिळाला आहे.चंदगड तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या कविता देसाई हिचे धनगरवाडा (नगरगाव) येथील आरोग्य शिबिर आटोपून परतत असताना तिलारी घाटात झालेल्या अपघातात निधन झाले. या अपघातात वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण ५ जि.प. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.कविता हिला तनिष्का ही एकुलती कन्या असून, तिच्यावर अतिशय प्रेम होते. तनिष्का सध्या चंदगड येथील स्टेफिन इंग्रजी शाळेत लोअर के.जी.मध्ये शिकत असून, तिला उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न कक्ष अधिकारी बाजीराव पाटील पूर्ण करणार असल्याने तनिष्काला मोठे पाठबळ मिळाले आहे.मृत्यूपूर्वी काही क्षण अगोदर मृत्यूची चाहुल लागलेल्या कविता हिने ‘मी आता जगू शकत नाही, कृपा करून माझ्या मुलीला सांभाळा व शिकवा’ अशी आर्त हाक देऊन कविताने जगाचा निरोप घेतला. खऱ्या अर्थाने तिच्या आर्त हाकेला बाजीराव पाटील यांनी ‘ओ’ देऊन माणुसकी जपून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.पाटील यांनी पर्यावरणपूरक फाटकेमुक्त व साधेपणाने दिवाळी साजरी केली. शिवाय आपल्या बहिणीला भाऊबीज भेट न देता ती तनिष्काच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिली. पाटील यांनी दिवाळीत तनिष्काचे घरी भेट देऊन तिला कपडे, फराळ, मिठाई बरोबरच शासनाचे किसान विकासपत्र, कन्या समृद्धी योजना व विमा असे एकूण ६ लाखांचे सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले असून, सदरची रक्कम तिला २१ वर्षांनंतर मिळणार असलेने तिच्या विवाहाच्या व उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे.यावेळी तनिष्काचे वडील सदानंद देसाई उपस्थित होते.