शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
3
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
4
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
5
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
6
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
7
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
8
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
9
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
10
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
11
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
12
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
13
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
14
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
15
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
16
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
17
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
18
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
19
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
20
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: पालकमंत्रीही उतरणार ‘गडहिंग्लज’च्या मैदानात !, मुश्रीफांचे बारकाईने लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:29 IST

अर्जुन आबिटकरांनी घेतली माजी नगरसेवकांची भेट

राम मगदूमगडहिंग्लज : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी रविवारी गडहिंग्लज शहरातील ‘त्या’ माजी नगरसेवकांची भेट घेतली. तब्बल दोन तासांच्या चर्चेत त्यांनी सर्वप्रकारची ‘ताकद’ देण्याची ग्वाहीदेखील ‘त्यांना’ दिल्याची खात्रीलायक बातमी आहे. त्यामुळे पालकमंत्री आबिटकरदेखील गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची वंदता असून, गडहिंग्लजमधील त्यांच्या ‘एंट्री’ची शहरात जोरदार चर्चा आहे.दोन वर्षांपूर्वी जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे गडहिंग्लज शहरात पक्षाची ताकद वाढली असून, त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे दिली आहे. मात्र, अलीकडे झालेल्या ‘राष्ट्रवादी’च्या जाहीर कार्यक्रमात ही ‘त्रिमूर्ती’ दिसली नाही. यावरूनच ते ‘राष्ट्रवादी’तही नाराज असल्याची चर्चा शहरात आहे. या पार्श्वभूमीवरच आबिटकरांनी त्यांची भेट घेतल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘ते’ आपल्यासोबतच..!आठवड्यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आयोजित ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभात ‘खणगावे व भद्रापूर’ हे आज उपस्थित नसले तरी ते आपल्यासोबत आहेत, असे विधान माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आबिटकरांच्या भेटीची शहरात चर्चा आहे.

मुश्रीफांचे बारकाईने लक्षमुश्रीफ यांना ‘गडहिंग्लज’करांच्या मानसिकतेचा परिपूर्ण अभ्यास आहे. म्हणूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मुंबईत ‘त्या’ तिघांचा पक्षप्रवेश करवून घेतला होता. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पक्षांतर्गत ‘घडामोडी’कडेही त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे खणगावे, भद्रापूर यांना ते सहजासहजी ‘राष्ट्रवादी’तून सोडतील असे वाटत नाही.

‘महायुती’मधील दुसरा दरवाजानाराज मंडळी माजी पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी आमदार संजय घाटगे यांच्याही संपर्कात आहेत. म्हणूनच आबिटकरांच्या माध्यमातून नाराजांसाठी महायुतीचा दुसरा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न असावा अशीही चर्चा आहे.

पुन्हा ‘जनता दल-जनसुराज्य’!२००६ मध्ये गडहिंग्लज कारखान्याप्रमाणे गडहिंग्लज नगरपालिकेतही ‘जनता दल-जनसुराज्य’ आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता. तशी मोट नव्याने बांधण्यासाठी सावकरांच्याही हालचाली सुरू असल्याने ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून जुन्या परिवाराशी जुळवून घेऊन ‘सत्ते’सोबत जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

सूर कायम.. दरी वाढली..!पराभवाची तमा न बाळगता जनता दलाच्या विरोधात उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून ‘राष्ट्रवादी’ला ऊर्जितावस्था दिलेल्या गुंड्या पाटील यांच्याकडे शहरातील कारभाराची सूत्रे आपसूकच गेली. तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी विधानसभा निवडणुकीसह अन्य कार्यक्रमातही पक्षाची ‘ताकद’ दाखवली. मात्र, आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा ‘त्यांचा’ सूर असल्याने दरी वाढली आहे.