शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: स्थलांतर, शाळेबाबत पालकमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्णय, पुरस्थितीचा घेतला आढावा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 27, 2023 17:30 IST

जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. 

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडूनही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे, एक दरवाजा बंद झाला आहे त्यामुळे पुराच्या भीतीने स्थलांतरित केलेल्या नागरिकांना उद्या, शुक्रवारपासून आपआपल्या घरी परत पाठवून द्या अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. पुराच्या भीतीने गेले दोन दिवस बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा देखील उद्यापासून वाजणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी हॉलमध्ये पुरस्थितीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. पालकमंत्री केसरकर म्हणाले, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर तसेच कुंभी, कासारी, व तुळशी धरण भरले असते तर पंचगंगेची पाणी पातळी ५ ते ७ फुटांनी वाढले असते. पण कुंभी, कासारी व तुळशी धरण अजून भरलेले नाही तसेच राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊसही कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरवाजे उघडल्यावरही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. गुरुवारी ऑरेज अलर्ट आहे त्यामुळे एक दिवस थांबा, पाणी पातळी किती वाढते, कमी होते, परिस्थिती बघून शुक्रवारी सकाळी स्थलांतरित झालेल्या नागरिकांना घरी पाठवा. अनेक दिवस त्यांना घराबाहेर ठेवणे योग्य नाही.परीक्षांसाठी वेळ..पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र या दोन दिवसांमध्ये अनेक शाळांमध्ये पेपर सुरु होते ते रद्द करावे लागले. पण त्याचा मुलांच्या अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होऊ देणार नाही. परीक्षा घेण्यासाठी वेगळी तारीख दिली जाईल असेही पालकमंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरDipak Kesarkarदीपक केसरकर