शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खवय्यांच्या वाढत्या मागणीमुळे भाकरीला ‘अच्छे दिन’, महिलांना मिळाला रोजगार; यंदा 'ज्वारी-बाजरी वर्ष' जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:09 IST

..त्यामुळे खवय्यांचा चपातीपेक्षा भाकरीकडे ओढा वाढला

उद्धव गोडसेकोल्हापूर : गोरगरिबांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या ज्वारीच्या भाकरीने अलीकडे हॉटेल्सच्या मेन्यू कार्डमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. चविष्ट आणि आरोग्यदायी गुणधर्मांमुळे भाकरीला मागणी वाढली आहे. परिणामी भाकरी करणाऱ्या महिलांनाहीहॉटेल्समध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. भाकरीच्या वाढत्या मागणीमुळे ज्वारीनेही गेल्या दोन वर्षांत चांगलाच भाव खाल्ला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष 'ज्वारी-बाजरी वर्ष' जाहीर केल्याने ज्वारी चर्चेत आहे.एकेकाळी भाकरी हा गरिबाघरचा खाद्यपदार्थ समजला जायचा. सणासुदीला होणारी पुरणपोळी आणि चपातीचा अपवाद वगळता गरिबांच्या आहारात भाकरीच नित्याची होती. त्याउलट पैसेवाल्यांच्या घरात चपाती खाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण, ज्वारीच्या तुलनेत गहू पचनास जड आहे. शिवाय चपातीप्रमाणे भाकरी तेलकट नसते, त्यामुळे खवय्यांचा चपातीपेक्षा भाकरीकडे ओढा वाढला आहे. याचे प्रतिबिंब हॉटेल्सच्या मेन्यू कार्डमध्येही दिसत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार बहुतांश हॉटेल्समध्ये जेवणाच्या ताटात भाकरी दिली जाते. त्यामुळे एकेकाळी केवळ गरिबांच्या आहारात दिसणारी भाकरी आता सर्वत्र दिसत आहे.

महिलांना मिळाला रोजगारभाकरी करणे हे कौशल्याचे काम महिलाच करतात. त्यामुळे महिलांना हॉटेल्समध्ये रोजगार निर्माण झाला आहे. हॉटेल्समध्ये भाकरी करण्याचे काम दुपारी आणि रात्री अशा दोन सत्रात चालते. प्रत्येक सत्रात महिलांना प्रत्येकी चार ते पाच हजार रुपये पगार दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३०० हॉटेल्समध्ये एक हजारहून जास्त महिला हे काम करतात.

लाखोंची उलाढालभाकरीला मागणी वाढताच ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या ज्वारीचे दर सध्या ४० ते ५० रुपये प्रतिकिलो आहेत. गव्हाच्या तुलनेत ज्वारीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. हॉटेल्समध्ये भाकरीचे दर २५ ते ५० रुपयांपर्यंत आहेत. यातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

कोल्हापुरात भाकरीचे अनेक पर्यायकोल्हापुरात ज्वारी, नाचणी, बाजरी आणि मक्याच्या भाकरी केल्या जातात. यातील मक्याच्या भाकरी अलीकडे खूपच कमी ठिकाणी केल्या जातात. नाचणीच्या भाकरी करण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी सहज मिळतात.

यामुळे भाकरीला मागणी...मोठ्या शहरांमधील अनेक महिला चपाती करतात; पण त्यांना भाकरी करता येत नाही. परिणामी इच्छा असूनही घरात भाकरी खायला मिळत नाही. यामुळे बाहेर पडल्यानंतर हॉटेल्समध्ये भाकरी खायला प्राधान्य दिले जाते. प्रवासात चपाती किंवा रोटीपेक्षा भाकरी खाणे आरोग्यदायी असते. शिवाय मांसाहारासोबत भाकरी आवडीने खाल्ली जाते, त्यामुळे सर्वच वयोगटातील खवय्यांकडून भाकरीला मागणी वाढली आहे.पन्हाळ्याची पिठलं-भाकरी प्रसिद्धपन्हाळ्यावर गेल्यानंतर पर्यटकांना पिठलं-भाकरी आकर्षित करते. इचलकरंजीत अनेक वर्षांपासून भाकरी आणि मटण थाळी प्रसिद्ध आहे, तर शिरोळमध्येही साखर कारखान्यावर चविष्ट पिठलं-भाकरी मिळते.

चवदार आणि पचायला हलकी असल्यामुळे ग्राहकांकडून भाकरीला मागणी वाढली आहे. विशेषत: मांसाहाराची खासियत असलेल्या हॉटेल्समध्ये भाकरीच खाण्याला प्राधान्य दिले जाते. - उमेश भवड, मालक, हॉटेल चावडी, कळंबा 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhotelहॉटेलWomenमहिला