शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Shahu Maharaj Jayanti Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू प्रेमीचे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 12:57 IST

Shahu Maharaj Jayanti Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

ठळक मुद्देराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू प्रेमीचे अभिवादनशाहू जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहारराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मधील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, समरजितसिंह घाटगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, शाहू प्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार जयंत आसगावकर, समरजीत घाटगे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिकतर्फे शाहू महाराज जयंती साजरी

महापालिकेतर्फे लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस आणि दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळ, महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील शाहू महाराज यांच्या अर्धपुतळयास प्रशासक डॉ. बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार मंडलिक, आमदार जाधव, ऋतुराज पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, अशोक जाधव, संदिप नेजदार, सुभाष बुचडे, सत्यजीत कदम, सुनिल कदम, माजी नगरसेविका माधुरी लाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, कादर मलबारी, गणी आजरेकर, बाबा पार्टे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर