शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 17:53 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

ठळक मुद्देपंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन तटाकडील तालीम येथे प्रतिमा पूजन

कोल्हापूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी सभागृहात पंडित त्यांच्या प्रतिमेस महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेता अजित ठाणेकर व कर्मचारी उपस्थित होते.भाजपतर्फे २४० बुथवर उपाध्याय यांना अभिवादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक तथा भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या १०४ व्या जयंती निमित्त शुक्रवारी भाजपच्या २४० बुथवर प्रतिमा पुजन करण्यात आले. यानिमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर भाजपाचे ध्वज उभारण्यात आले. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या तपोवन वॉर्ड  मधील बूथ क्रमांक ६१ वर उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे याच भूमिकेतून उपाध्याय यांनी संपूर्ण आयुष्य व्यतित केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जरगनगर येथील तर देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी तटाकडील तालीम वॉर्ड मधील बुथवर प्रतिमा पूजन केले. जिल्हा उपाध्यक्ष संजय सावंत व विजय आगरवाल यांनी बूथ अध्यक्षांपर्यंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

या कार्यक्रमांना संघटन मंत्री अशोक देसाई, गटनेते अजित ठाणेकर, मनपा विरोधीपक्ष नेते विजय सुर्यवंशी, हेमंत अराध्ये, राजू मोरे, संजय सावंत, अशोक लोहार, अमोल पालोजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका