शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवप्रेमींतर्फे छत्रपती संभाजीराजे यांना ‌अभिवादन, ३६३ वी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:30 IST

छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरात शिवप्रेमींतर्फे छत्रपती संभाजीराजे यांना ‌अभिवादन३६३व्या जयंतीनिमित्त संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संभाजी महाराज उद्यानाच्या परिसराची सकाळी सात वाजता स्वच्छता केली. त्यानंतर रांगोळी काढून फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली. स्मारकाच्या परिसरातील जुना भगवा ध्वज बदलून त्या ठिकाणी नवीन ध्वज लावण्यात आला.

उपस्थित शिवप्रेमींतर्फे दुग्धा‌भिषेक करण्यात आला. पुतळ्याला नवीन भगवा शेलाही घालण्यात आला. पुष्पहार घालून, प्रेरणामंत्राचे पठण करून संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. उपस्थितांना साखर व पेढे यांचे वाटप करण्यात आले.

सोशल डिस्टन्सिंग पाळून व तोंडाला मास्क लावून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात संभाजीराजे यांची ३६३वी जयंती साजरी केली. यावेळी प्रतिष्ठानचे साताप्पा कडव, योगेश रोकडे, प्रवीण कुरणे, प्रफुल्ल भालेकर, विश्वास गंगाधर, संदीप पाडळकर, कुलदीप यादव, सुशांत शिंदे, सागर बोडेकर, बजरंग गावडे, आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी बिग्रेडतर्फे अभिवादनछत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील प्रमुख उपस्थित होते.यानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील म्हणाले, अनेक संकटांचा सामना करणारे छत्रपती संभाजी यांच्या चरित्रातून लढण्याचे बळ मिळते; तर संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात गावोगावी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.

यात सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप करण्यात आले. गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी विकी जाधव, अभिजित भोसले, अभिजित कांझर, भगवान कोईगडे, संभाजी साळोखे, युवराज शिंदे, सागर पाटील, नीलेश सुतार, मदन परीट, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर