भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे गडहिंग्लज प्रांत कार्यालयाच्या आवारातील अर्धपुतळ्यास व हसूरवाडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता शिवाजी कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे, हसूरवाडीचे सरपंच संजय कांबळे, ज्ञानराजा चिघळीकर, भीमराव मोहिते, एस. बी. बाळेशगोळ, महेश कांबळे, सखाराम कांबळे, आदी उपस्थित होते.
जागृती हायस्कूल व रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात बाळासाहेब खरात यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी विजय चौगुले, विलास शिंदे, गुरुलिंग खंदारे, आशा डोमणे, आशपाक मकानदार, आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एस. एन. देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी जी. आय. चव्हाण, एम. एस. शिंदे, एस. एस. कुंभार, डी. बी. कांबळे, ए. एम. गुरव, ए. ए. पोतदार, व्ही. आर. पालेकर, आदी उपस्थित होते.
----------------------
फोटो ओळी : हसूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शिवाजी कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी परशुराम कांबळे, ज्ञानराजा चिघळीकर, सरपंच संजय कांबळे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०६१२२०२०-गड-०१