शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 14:32 IST

कोल्हापूर येथील रंगबहार कला संस्थेमार्फत महर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अ

ठळक मुद्देरंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन कलामहर्षींच्या आठवणींचा जागर

कोल्हापूर :  येथील रंगबहार कला संस्थेमार्फत महर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अजेय दळवी यांनी पद्माराजे उद्यानातील महर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमास श्रीकांत डिग्रजकार, धनंजय जाधव, विजय टिपुगडे, मनोज दरेकर, सर्जेराव निगवेकर, रियाज शेख, संजीव संकपाळ, अतुल डाके हे उपस्थित  होते. या प्रसंगी कलामहर्षींच्या आठवणींचा जागर करण्यात आला. बाबूराव पेंटर हे जरी कोल्हापूरचे असले, तरी गुरुंचे गुरू म्हणून त्यांना ओळखतात.

चित्रपटसृष्टीतील पहिलेवहिले तंत्रज्ञान बाबूराव पेंटर यांनीच रूढ केले आहे. यामध्ये भारतीय कॅमेर्‍याने चित्रित केलेला पहिला चित्रपट सैरंध्री असो, याच चित्रपटासाठी स्त्री कलाकाराकडून स्त्री पात्राची भूमिका असो, चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू करण्याचा प्रभातच्या आधी महाराष्ट्र फिल्म कंपनीचे मानचिन्ह असो, निर्मिती, वेशभूषा, ट्रिकसीन असो, की प्रसिद्धीसाठी पोस्टरचा वापर असो, ही सारी तंत्रे पेंटरांनी पहिल्यांदाच चित्रपटासृष्टीत रूढ केली, अशी माहिती अजेय दळवी यांनी दिली. श्रीकांत डिग्रजकर म्हणाले, चित्रकार,शिल्पकार ,तंत्रज्ञ,चित्नपट-निर्माते व दिग्दर्शक अश्या बहुआयामी कार्यामुळेच कलामहर्षी म्हणून बाबूराव पेंटर गौरविले जात. प्रतिमा चित्रणातील  कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य, विशेषत: पडद्याची कलात्मकता या बाबतींत त्यांनी खूपच लौकिक मिळविला होता. 

 रियाज शेख यांनी सांगिलते, कि चित्र शिल्प, आदी कलाक्षेत्रात बाबूराव पेंटर यांनी स्वाध्यायाच्या बळावरच आपली प्रगती करून घेतली होती. बाबूराव पेंटर यांच्या चित्रकारितेने रसिकांना भुरळ घातली होती. अशा कालखंडाचे प्रतिनिधी म्हणून बाबूराव पेंटर यांचे कलाकर्तृत्व उदंड मानावे लागेल.

 

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर