शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन महिन्यांनंतर लाईट, कॅमेरा ॲक्शन -चित्रपट, मालिका चित्रीकरणाला ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:17 IST

यामुळे कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध संघटना, संस्थांनी राज्य शासनाकडे चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत मागणी केली होती. विशेषत: कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला होता.

ठळक मुद्देत्यामुळे कलानगरीतील कलाकारांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार, हे निश्चित आहे.

 कोल्हापूर : चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने रविवारी या संदर्भातील आदेश काढले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील सर्व अटी आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात चित्रीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. यामध्ये चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही थांबले आहेत. परिणामी कलाकारांसह अनेक कामगारांचे काम थांबले आहे. सध्या शासनाने लॉकडाऊन शिथिल केला आहे. यामुळे कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध संघटना, संस्थांनी राज्य शासनाकडे चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत मागणी केली होती. विशेषत: कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला होता.

यावर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी रविवारी उशिरा चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिल्याचे आदेश काढले. यामध्ये कोरोनासंदर्भातील कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने चित्रीकरण करावे. असे आढळल्यास चित्रीकरण तत्काळ बंद करण्यात येईल. चित्रीकरणाची परवानगीसाठी संबंधित जिल्हाधिकारी तसेच चित्रपट, रंगभूमी विकास महामंडळ यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे.सव्वादोन महिन्यांनंतर लाईट, कॅमेरा ॲक्शनकोरोनामुळे चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. तसेच श्रोत्यांनाही जुन्या मालिका पाहण्याची वेळ आली आहे. सव्वादोन महिन्यांनंतर अखेर लाईट, कॅमेरा आणि ॲक्शनचा आवाज घुमणार आहे. तसेच श्रोत्यांना नवीन मालिका पाहण्याची लवकरच मिळणार आहे.कोल्हापुराला प्राधान्यमुंबई, पुणे येथे रेड झोन असल्यामुळे या ठिकाणी चित्रीकरणासाठी कोणी पुढाकार घेतील याची शाश्वती फार कमी आहे. याचबरोबर कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असून कलाकार वर्गही मोठा आहे. त्यामुळे कोल्हापुराला प्राधान्य मिळेल असे चित्र आहे. त्यामुळे कलानगरीतील कलाकारांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार, हे निश्चित आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर