शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Kolhapur: मौनी विद्यापीठ तंत्रनिकेतनला अनुदान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 11:54 IST

गारगोटी : येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीअरिंग या अनुदानित संस्थेतील तीन विनाअनुदानित पदविका ...

गारगोटी : येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीअरिंग या अनुदानित संस्थेतील तीन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रमांना २०२३-२४ पासून ९० टक्के सरकारी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मंगळवारी घेण्यात आला. या संस्थेत १६ शिक्षकांची पदेही निर्माण करण्यात येतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते.संस्थेत सध्या विद्युत अभियांत्रिकी ६०, यंत्र अभियांत्रिकी १२०, संगणक अभियांत्रिकी ४० अशी २२० प्रवेश क्षमता आहे. सध्याच्या अनुदानित संस्थेतील अधिव्याख्याता (उपयोजित यंत्रशास्त्र) या पदाचे रुपांतरण कर्मशाळा अधीक्षक या पदातही करण्यात येईल. या अनुदानापोटी आणि पदनिर्मितीसाठी एकूण १ कोटी ७७ लाख ७ हजार ९९२ इतका वार्षिक निधी देण्यासही मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारने अतिदुर्गम ग्रामीण भागात कमी खर्चात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून स्थापन केलेल्या एस. राधाकृष्णन यांच्या समितीने देशातील १० विद्यापीठात तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू करण्याची शिफारस केली होती. यात गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाचा समावेश आहे.या विद्यापीठात सिव्हिल आणि ग्रामीण इंजिनीअरिंग (डिप्लोमा), सिव्हिल इंजिनीअरिंग (डिप्लोमा), कॉम्प्युटर इंजिनीअरिंग (डिप्लोमा), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (डिप्लोमा), इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग (डिप्लोमा), इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली-कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (डिप्लोमा), सूचना प्रौद्योगिकी (डिप्लोमा), मेकॅनिकल इंजिनीअरिंग (डिप्लोमा) हे अभ्यासक्रम शिकविले जातात.

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. -चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील