शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आजी - माजी विद्यार्थ्यांतर्फे कोल्हापुरात गुरुवारपासून राजाराम महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:28 IST

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह विचारांचे अदान - प्रदान करण्यासाठी राजाराम महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान राजाराम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी शाहू छत्रपती यांच्या हस्ते या महोत्सवाचे आयोजन होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. खेमनार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआजी - माजी विद्यार्थ्यांतर्फे कोल्हापुरात गुरुवारपासून राजाराम महोत्सवतीन दिवस रंगणार कार्यक्रम; आजी - माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह विचारांचे अदान - प्रदान करण्यासाठी राजाराम महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान राजाराम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी शाहू छत्रपती यांच्या हस्ते या महोत्सवाचे आयोजन होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. खेमनार यांनी पत्रकार परिषदेत दिली.खेमणार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला - गुणांना वाव देण्यासह त्यांना भावी आयुष्यात विविध गोष्टीची माहिती व्हावी, या उद्देशाने विविध मान्यवर व्यक्तीचे व्याख्यानही या दरम्यान होणार आहे. महोत्सवात जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, हिरवे बाजारचे पोपटराव पवार, दिग्दर्शक चंद्रकांत जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. यासह आप्पासाहेब खोत यांचे कथा कथन, हर्षल जोशीचे एकपात्री प्रयोगाचे सादरकरण होणार आहे.माजी जीएस शशिकांत पाटील म्हणाले, माजी विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. या दरम्यान महाविद्यालयात परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत विविध फन गेम, आनंद बझार, खाद्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हेमंत पाटील म्हणाले, हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून ५डिसेंबर रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते समारोप होणार आहे. याप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण केले जाणार आहे.प्रा. डॉ. अंजली पाटील ,प्रा. संजय पाझरे, प्रा. डॉ. अनिता बोडके, माजी जीएस जयदिप मोहिते, दिपक जेमेनीस, श्रीकांत सावंत,सुनिल धुमाळ, मिलींद दिक्षित, अविनाश मिरजकर,जब्बीन शेख, धनंजय चव्हाण, अर्पणा पाटील आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Rajaram Collegeराजाराम कॉलेजkolhapurकोल्हापूर