शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नातवाने घेतली वृध्दाश्रमात आजोबांची भेट, साऱ्यांसाठी आणले कपडे, घेतले सहभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 18:39 IST

आपल्या नातेवाईकांच्या प्रतिक्षेत असलेल्या उर्वरित दोघांपैकी निपाणीतील एका आजोबांची त्यांच्या नातवाने बुधवारी घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रमात जाउन भेट तर घेतलीच, परंतु आजोबांसोबत सहभोजनही घेतले. लोकमतच्या वृत्तामुळे घोसरवाड येथील वृध्दाश्रमातील त्या चौघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश निर्माण झाला.

ठळक मुद्देनातवाने घेतली वृध्दाश्रमात आजोबांची भेटसाऱ्यांसाठी आणले कपडे, घेतले सहभोजन

कोल्हापूर : आपल्या नातेवाईकांच्या प्रतिक्षेत असलेल्या उर्वरित दोघांपैकी निपाणीतील एका आजोबांची त्यांच्या नातवाने बुधवारी घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रमात जाउन भेट तर घेतलीच, परंतु आजोबांसोबत सहभोजनही घेतले. लोकमतच्या वृत्तामुळे घोसरवाड येथील वृध्दाश्रमातील त्या चौघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश निर्माण झाला.शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे बाबासाहेब पुजारी हे जानकी वृद्धाश्रम चालवतात. धनगर समाजासाठी आपल्या जागेत लंगर चालवता चालवता वृध्दाश्रमही त्यांनी सुरु केला. या वृध्दाश्रमात सध्या २४ वेगवेगळ्या ठिकाणचे वृध्द आसरा घेत आहेत. ज्यांचे कोणी नाही, त्यांच्यासाठी हा वृध्दाश्रम म्हणजे वरदान आहे. ज्यांना घरचे कोणी पहात नाहीत, अशांनाही या आश्रमाचा आधार वाटतो आहे.मायेच्या माणसांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेल्या यातील चार वृध्दांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. लोकमतमध्ये मंगळवारी यासंबंधी प्रसिध्द झालेल्या वृत्तामुळे दोघांच्या नातेवाईकांनी घोसरवाड येथे जाउन त्यांच्या वडिलांची कुटूंबासह भेट घेतली होती. आणखी दोघांना त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्षा होती.

बुधवारी त्यांच्यापैकी निपाणी येथील वृध्दाच्या २३ वर्षीय नातवाने बातमी वाचून भेट घेतली. वडील येउ शकले नसले तरी नातवाने मात्र आपल्या आजोबांना आठवणीने कपडे, फराळ आणि भेटवस्तू आणल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी वृध्दाश्रमातील साऱ्यांसाठीच काहींना काही भेट आणली होती.

नातवाने आजींना साड्या तर आजोबांना पँट-शर्ट आणले.फराळही आणला. याशिवाय साºयांसोबत सहभोजनही केले. दिवसभर या वृध्दाश्रमात थांबून त्यांच्यासोबत गप्पागोष्टी केल्या.लोकमतने फोडली वाचाबाबासाहेब पुजारी आणि त्यांच्या बहिणीमार्फत हे वृध्दाश्रम चालविले जाते. परिसरातील लोक धान्याची व इतर सारी मदत करतात, परंतु आर्थिक मदतीअभावी कधीकधी गाडा अडतो. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी या वृध्दाश्रमासाठी मदत करावी, असे आवाहन पुजारी यांनी केले आहे. दरम्यान, रेंदाळचे सामाजिक कार्यकर्ते मोहन खोत यांनी लोकमतने या वृध्दांना मदत करण्यासाठी वाचा फोडली याबद्दल आभार मानले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर